Glenmark Pharma share surge: मोठी बातमी! Glenmark Pharmaceuticals कंपनीचा बाजारात बोलबाला शेअर थेट १०% उसळला 'हे' आहे त्यामागचे कारण !

प्रतिनिधी: ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेडचा समभाग (Stock) सकाळी सत्र सुरू होताच थेट १०% उसळला आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल (Glenmark Pharmaceuticals Limited) कंपनीची उपकंपनी (Subsidiary) अबीवी (Abbvie Limited) कंपनीशी विशेष जागतिक करार (Exclusive License Agreement) केल्यामुळे हा शेअर बाजारात चर्चेत आला आहे. जागतिक स्तरावर कॅन्सर व ऑटोइम्युनीन (Autoimmune) करार केल्यामुळे कंपनी चर्चेत आली. अंतिमतः मोठ्या अंकाने शेअर्सने उसळी घेतली.एनएसई वर ग्लेनमार्क फार्माचा शेअर २,०९४.४० वर पोहोचला, जो १०% ने वाढला. ज्यामुळे कंपनीचा शेअर अप्पर सर्किटवर पोहोचला आहे.


बाजारातील मार्केट विश्लेषकांनी विशेषतः मोतीलाल ओसवाल कंपनीने 'खरेदी' (Buy Ratings) दिल्यामुळे कंपनीच्या समभागात गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष होते. मोतीलाल ओसवाने लक्ष्य किंमत (टार्गेट प्राईज) २४३० रूपये प्रति शेअर सांगितली होती. कंपनीच्या प्रगतीचा आढावा अनेक ब्रोकरेज कंपन्यानी केला होता. ज्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काळात कंपनीच्या सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) २३% वाढू शकतो. यामध्ये १०% वाढ घरगुती बाजारातून, ७% युएस बाजारात, १४% इतर राष्ट्रांत १२% इयु (European Union) मध्ये होऊ शकते असे विश्लेषकांनी म्हटले होते.


कंपनी आपल्या गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. विशेषतः जेनेरिक्स, इंजेक्टेबल उत्पादनात कंपनी अधिक सक्रिय आहे. मोतीलाल ओसवानेने याविषयी बोलताना, ग्लेनमार्क फार्मा कंपनीचा करार ग्लेनमार्क फार्माच्या अनेक पैलूंना मान्यता देतो.  ऑन्कोलॉजी आणि ऑटो-इम्यून रोगांसाठी आयजीआयच्या (IGI) मधील बीट प्रोटिन (BEAT Protein) व्यासपीठाची (प्लॅटफॉर्मची) ताकद, रिसिप्ड/रिफ्रॅक्टरी मल्टिपल मायलोमावर उपचार करण्यासाठी ISB-2001 ची क्षमता आणि यशस्वी क्लिनिकल चाचण्या आणि त्यानंतरच्या व्यावसायिकीकरणानंतर ISB-2001 ची व्यावसायिक व्यवहार्यता पाहून या डीलला महत्व प्राप्त झाले आहे.' मोतीलाल ओसवाल कंपनीच्या विश्लेषणानुसार, त्यानुसार, आर्थिक वर्ष २५-२७ मध्ये या शेअरची विक्री ११%, करपूर्व नफा (EBITDA) १७% आणि करोत्तर नफा (PAT) सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) अनुक्रमे १६,३०० कोटी, ३,३०० कोटी आणि २,००० कोटी होईल असा अंदाज आहे.


दरम्यान, HSBC ने ग्लेनमार्क फार्मावरील त्यांचे लक्ष्य किंमत (Target Price) ३२% पेक्षा जास्त वाढवून प्रति शेअर १७२० वरून २२७५ केले आहे. नोमुरा (Nomura) ने मात्र 'तटस्थ' (Neutral) राहण्याचा इशारा दिला होता. नोमुराने आपल्या विश्लेषणात सांगितले की या करारात ७०० दशलक्ष डॉलर्सची आगाऊ रक्कम (Upfront) समाविष्ट आहे, ज्यामध्ये १.२२५ अब्ज डॉलर्सपर्यंत विकास, नियामक (Regulatory) आणि व्यावसायिक टप्पा (Commerical Vechile) रक्कम (Payment) तसेच निव्वळ विक्रीवर दुहेरी अंकी रॉयल्टी समाविष्ट आहे. हा करार भारतीय औषध कंपनीने केलेला सर्वात मोठा परवाना करार आहे आणि त्याचे मूल्य अपेक्षेपेक्षाही जास्त आहे.'


त्यामुळेज आज कंपनीच्या समभागात मोठी वाढ झाली होती. बाजारातील माहितीनुसार, जून महिन्यात कंपनीच्या समभागात २८% वाढ झाली होती.

Comments
Add Comment

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

INDW vs ZIMW: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, कर्णधार स्मृती मंधानाने गोलंदाजी निवडत म्हणाली..

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना होत आहे. कर्णधार स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधारपदाची

Singapore Haze 2026 : इंडोनेशियातील आगीचा सिंगापूरला फटका; प्रदूषणावर कंपन्यांवर होणार कारवाई?

सिंगापूर : इंडोनेशियातील जंगलांमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या धुरामुळे शेजारील सिंगापूरमधील हवा अत्यंत विषारी

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस