Pravin Gaikwad: मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं, काय आहे प्रकरण?

सोलापूर: अक्कलकोटमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ही घटना घडली. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं असल्याचं बोललं जातंय. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते.

नेमकं काय आहे प्रकरण?


प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते. दरम्यान, प्रवीण गायकवाड यांचा आज अक्कलकोटमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र, या सत्कार समारंभाच्या ठिकाणीच त्यांना काळं फासण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याची माहिती असून पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

कशा पद्धतीने फासलं काळं?


प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत. एकूण दोन संभाजी ब्रिगेड आहेत. गायकवाड हे दुसऱ्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्रभर दौरे करत असतात. ते आज अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमस्थळी दाखल होत असतानाच शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते तेथे जमा झाले आणि गायकवाड यांना काळे फासण्यात आले. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्यानंतर प्रवीण गायकवाड हे कारमध्ये जाऊन बसले. पण शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी कारमध्ये घुसून गायकवाड यांना मारहाण केली. त्यानंतर रस्त्यावरही त्यांना मारहाण झाल्याचे समोर आले. हे प्रकरण घडल्यानंतर अद्याप प्रवीण गायकवाड यांनी कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी