चीन दौऱ्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

बीजिंग : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर चीनच्या दौऱ्यावर आहेत. भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्यादृष्टीने हा दौरा महत्त्वाचा आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांच्याशी चर्चा केली. आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुंता बघता भारत आणि चीन यांनी द्वीपक्षीय चर्चेतून एकमेकांविषयीचा विश्वास वाढेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विचारांची खुली देवाणघेवाण झाली आणि एकमेकांविषयीचा विश्वास वाढला तरच दोन्ही देशांतील मैत्री वृद्धिंगत होईल. दोन्ही देशांच्या हितांचे रक्षण करणे शक्य होईल यावर चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

परराष्ट्र मंत्री त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सकाळी सिंगापूरहून बीजिंगला पोहोचले. जयशंकर चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत सहभागी होण्यासाठी चीन दौऱ्यावर आहेत. भारत आणि चीन दरम्यान २०२० मध्ये लडाखमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर पहिल्यांदाच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर चीनच्या दौऱ्यावर आहेत. सकारात्मक चर्चेने एस. जयशंकर यांच्या चीन दौऱ्याची सुरुवात झाली आहे. दौरा यशस्वी होईल, असा विश्वास एस. जयशंकर यांनी व्यक्त केला.

भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचे सामान्यीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कैलास मानसरोवर यात्रा हा या प्रक्रियेचा एक भाग आहे. मानसरोवरला जाण्यासाठीचा सोपा मार्ग सध्या ज्या भूभाभागत चीनचे नियंत्रण आहे त्या भागातून जातो. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चर्चेअंती चीनने या मार्गाचा वापर करुन पर्यटकांना मानसरोवला जाण्याची परवानगी दिली आहे. आता आणखी काही मुद्यांवर चर्चा होणार आहे. चर्चेद्वारे मैत्री वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीतही सहभागी होणार आहेत. तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठ होत आहे. या बैठकीत एस. जयशंकर भारताची बाजू मांडतील तसेच आशियाच्या विकासात परस्पर सहकार्यातून द्यायचे योगदान या विषयावर सविस्तर बोलणार आहेत. या व्यतिरिक्त परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सदस्यांशी द्विपक्षीय चर्चा पण करणार आहेत.
Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे