मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रांविरोधात २४ जुलैला सुनावणी

नवी दिल्ली:  दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाने रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली आहे. न्यायालयाने अहलमदकडून संबंधित कागदपत्रांची माहिती मागवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ जुलै रोजी होणार आहे.


प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) १७ जुलै रोजी हरियाणातील शिकोहपूरमधील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात वाड्रा यांच्यासह १० अन्य व्यक्तींची नावे आहेत. यात त्यांच्या मेसर्स स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचेही नाव आहे. ईडीने वाड्रा आणि त्यांच्या कंपनीच्या मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित एकूण ३७.६४ कोटी रुपयांच्या ४३ मालमत्ता जप्त केल्या आहेत.


या प्रकरणाची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. गुरुग्राममधील शिकोहपूर येथे जमीन खरेदीचा व्यवहार झाला होता. स्काय लाईट हॉस्पिटॅलिटीने साडेतीन एकर जमीन केवळ ७.५० कोटी रुपयांना खरेदी केली होती. वाड्रा या कंपनीचे संचालक होते. ही जमीन ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून खरेदी करण्यात आली होती. अवघ्या २४ तासांतच या जमिनीचा मालकी हक्क वाड्रा यांच्या कंपनीकडे गेला होता.


यानंतर २०१२ मध्ये स्काय लाईट हॉस्पिटॅलिटीने हीच जमीन डीएलएफ कंपनीला ५८ कोटी रुपयांना विकली. या व्यवहारातून कंपनीला मोठा नफा झाला. या प्रकरणात २०१८ मध्ये एफआयआर नोंदवण्यात आली होती.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि