पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कसं ठार मारलं ?

श्रीनगर : पहलगाम येथे धर्म विचारुन २६ जणांची हत्या करण्यात आली होती. हे नृशंस हत्याकांड करणारे तीन दहशतवादी सुरक्षा पथकांना चकवत तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लपून होते. अखेर पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांशी बोलण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करणे त्यांना भोवले. दहशतवाद्यांनी वापरलेल्या चिनी यंत्रांचे सिग्नल भारताच्या सुरक्षा यंत्रणेने पकडले. यानंतर स्थानिकांच्या मदतीने परिसराची पाहणी करण्यात आली. दहशतवादी नेमके कुठे लपले आहेत याची जास्तीत जास्त अचूक माहिती मिळवण्यात आली. ड्रोनचा वापर करुन परिसराची आकाशातून टेहळणी करण्यात आली.

दहशतवाद्यांनी चकमक होण्याआधीच्या १७ दिवसांत दोन वेळा पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांशी बोलण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर केला होता. अखेर दहशतवाद्यांची नेमकी स्थिती लक्षात आल्यावर सुरक्षा पथकांनी कारवाईची तयारी सुरू केली. श्रीनगरपासून काही किमी. अंतरावर असलेल्या दाचीगामच्या जंगलातील मुलनार येथे महादेव डोंगराजवळ लिडवास हे ठिकाण आहे. याच ठिकाणी दहशतवादी लपले होते. या भागात दीर्घकाळ लपणे शक्य आहे, यामुळे लवकर त्यांचा सुगावा लागला नही. पण सिग्नलच्या मदतीने सुरक्षा पथक दहशतवाद्यांचा माग काढू शकले.घेराव घालून दहशतवाद्यांची कोंडी करण्यात आली होती. पुरते अडचणीत सापडल्याची जाणीव होताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. चकमक झाली. या चकमकीत दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांकडून सुरक्षा पथकाने मोठा शस्त्रसाठा आणि चीनी बनावटीची संपर्क यंत्रणा यांची जप्ती केली.

सीमेवर पहारा असल्यामुळे दहशतवाद्यांना परत पाकिस्तानमध्ये जाणे कठीण झाले होते. यामुळे दहशतवादी डोंगराळ भागातील जंगलात लपले होते. ते वारंवार स्वतःची जागा बदलत होते. पाकिस्तानमध्ये संपर्क करण्यासाठी त्यांच्याकडून सॅटेलाइट फोनचा वापर सुरू होता. या फोनमुळेच दहशतवाद्यांना शोधणे सुरक्षा पथकांना सोपे झाले. पण मधल्या काळात काही दिवस दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन बंद केला होता. ते कोणाशीही फोनद्वारे संपर्क करणे टाळत होते. यामुळे त्यांचा माग काढण्यास वेळ लागला. पण सुरक्षा पथकांची खात्री झाल्यावर इन्फ्रारेड ड्रोनच्या मदतीने जंगलात तपासणी करण्यात आली. उष्णतेच्या मदतीने मानवी अस्तित्वाची माहिती सांगणाऱ्या या ड्रोनने जंगलातील दहशतवाद्यांच्या लपण्याची जागा शोधण्यास सुरक्षा पथकाला मोलाची मदत केली होती. स्थानिकांनी दिलेली माहिती आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर दहशतवाद्यांच्या लपण्याचे नेमके ठिकाण शोधून सुरक्षा पथकाने धडक कारवाई केली.
Comments
Add Comment

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक