मोदी सरकारचे मोठे निर्णय : ५२,६६७ कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी

Union Cabinet Meeting Decision : 'उज्ज्वला' आणि तेल कंपन्यांसाठी भरघोस पॅकेज


नवी दिल्ली: अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण ५२,६६७ कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. या पॅकेजमध्ये एलपीजी, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत.



उज्ज्वला आणि तेल कंपन्यांना दिलासा


या बैठकीत सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना अधिक बळकट करण्यासाठी १२,०६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय, सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या तेल कंपन्यांना म्हणजेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमला ३०,००० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.


आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमती वाढलेल्या असतानाही, ग्राहकांवर दरवाढीचा बोजा पडू नये यासाठी सरकारने दर स्थिर ठेवले होते. यामुळे या कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. या तोट्याची भरपाई करण्यासाठी हे अनुदान १२ टप्प्यांमध्ये दिले जाईल. यामुळे कंपन्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.



शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर भर


शिक्षण क्षेत्रातही सरकारने मोठी घोषणा केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी ४,२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


याव्यतिरिक्त, ईशान्य भारतातील राज्यांच्या विकासासाठी ४,२५० कोटी रुपयांचे विशेष अनुदान पॅकेज मंजूर करण्यात आले आहे. तसेच, दक्षिण भारतात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मरक्कनम-पुदुच्चेरी या चार पदरी महामार्गासाठी २,१५७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


या निर्णयामुळे विविध क्षेत्रांमध्ये विकासाला गती मिळण्याची अपेक्षा असून, सर्वसामान्यांनाही याचा थेट फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि