लिपी आधी मरते, मग भाषा: दीपक पवार

वसई : "भाषा नंतर मरते, पण लिपी आधी मरते. तिच्या नियमित वापराची आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. माणसं, झाडं आणि भाषा तिघांनीही एकत्र जगल पाहिजे, तेव्हाच संस्कृती जिवंत राहते" असा संदेश सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक आणि मराठी भाषा संवर्धन कार्यकर्ते डॉ. दीपक पवार
यांनी दिला.


अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ उद्घाटनप्रसंगी ‘अभिजात मराठी भाषा आणि समकालीन संदर्भ’ या विषयावर बोलताना त्यांनी वाङ्मय मंडळांची घसरती स्थिती, वाचनसंस्कृतीचा ऱ्हास, रोमन लिपीचा वाढता वापर आणि लिपीच्या प्रमाणीकरणाची गरज यावर भर दिला. "आपल्या संगणक व मोबाईलच्या वापरात मराठी लिपीला प्राधान्य द्या" असे त्यांनी आवाहन केले.


मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही निधीअभावी विकासाची गती मंदावल्याचे त्यांनी सांगितले. "गेल्या काही वर्षांत अनेक मंडळं निष्क्रिय झाली असली तरी, ५०हून अधिक सर्जनशील उपक्रम राबवून आपण मराठीचा वारसा नव्या पिढीकडे पोहोचवू शकतो" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कार्यक्रमात वाङ्मयमंडळ विद्यार्थी अध्यक्ष महेश जयसवाल आणि उपाध्यक्ष नेहा साबळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सखाराम डाखोरे यांनी केले. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे खजिनदार हसमुख भाई शहा आणि संस्थेच्या सदस्य व सुप्रसिद्ध चरित्र लेखिका वीणा गवाणकर, सुप्रसिद्ध कवी सायमन मार्टिन यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Palghar Gas Leakage : पालघरमध्ये हायड्रोजन गॅसची गळती! मुंबई-गुजरात महामार्गावर १२ तासांचे थरारक आपत्कालीन ऑपरेशन

१३ सिलिंडरची गळती रोखली, १६० सिलिंडर सुरक्षित स्थळी हलवले मुंबई : मुंबई-गुजरात (Mumb

Palghar Wall Collapse : वाड्यात कारखान्याची भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू; 2 महिलांसह एका पुरुषाचा समावेश

पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कारखान्यातील भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

बाईईईई हा काय प्रकार! डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड ? शाळा प्रशासनाचा अजब अट्टाहास

मुंबई : मिरा-भाईंदर (Mira-BHayandar) परिसरातील शाळांमध्ये पर्यूषण पर्वाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या आहारावर लादल्या

गणेशोत्सव २०२६ : खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रयत्नांना यश! वसई-विरार महापालिकेकडून विसर्जन जेट्टीसह विशेष सुविधांची घोषणा

पालघर : पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा (Hemant Sawra) यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक

Eknath Shinde : पालघरच्या रुग्णालयातील मारहाण प्रकरण : उपमुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानंतर शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी!

पालघर : पालघरमधील (Palghar News) एका खासगी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आणि तेथे गोंधळ घालणे

Vasai factory accident : वसईमध्ये कारखान्यात मोठी दुर्घटना : ट्रान्सफॉर्मरचा रेडिएटर अंगावर पडल्याने ५४ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू!

वसई : वसईतील कामण (नायगाव पूर्व) येथील एका कारखान्यात कामगाराच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी