Palghar Leopard Attack : पालघरमध्ये बिबट्याचा भीषण हल्ला! 65 वर्षीय महिला शेतमजुराचा मृत्यू

पालघरच्या डहाणू तालुक्यातील मतेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात 65 वर्षीय महिला शेतमजुराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाकडे ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावण्याची मागणी केली असून, कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू तालुक्यातील मतेगाव येथे बिबट्याने 65 वर्षीय महिला शेतमजुरावर हल्ला करून तिचा जीव घेतला. तुळशी रामा सावर असे मृत महिलेचे नाव असून, त्या विक्रमगड तालुक्यातील सरशी गावातील रहिवासी होत्या. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे.



कामावरून परतताना बिबट्याची झडप


मिळालेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास तुळशी सावर या शेतातील काम आटोपून परतत होत्या. मतेगाव परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याने त्यांच्या मानेवर हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बिबट्या अंधाराचा फायदा घेत जवळच्या जंगलात पसार झाला होता. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.



वनविभागाच्या कारवाईची ग्रामस्थांची मागणी


या घटनेनंतर मतेगाव आणि आसपासच्या परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात तातडीने ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याला लवकर पकडण्यात आले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. शेतीच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.



एका महिन्यात दुसरी घटना; पालघरमध्ये चिंता वाढली


पालघर जिल्ह्यात यापूर्वी 9 ऑक्टोबर रोजी नवली परिसरातील भोगळे पाडा येथे 52 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर मतेगाव येथील घटनेमुळे मानव-बिबट्या संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून होत आहेत. त्यामुळे वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. या घटनेनंतर वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी कोणती पावले उचलली जातात आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षितता कशी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Food Poison: लग्नाच्या जेवणानंतर वऱ्हाड्यांना विषबाधा; भांडुपमधील गंभीर प्रकार समोर

मुंबई: मुंबईतील भांडुप परिसरात लग्नसमारंभातील जेवण केल्यानंतर तब्बल 70 ते 100 वऱ्हाडींची प्रकृती बिघडल्याची घटना

दिवाळीच्या काळात अन्नभेसळीविरोधात FDA ची मोठी कारवाई! 19.01 कोटींचा अन्नसाठा जप्त; अनेक व्यावसायिकांचे परवाने निलंबित

मुंबई : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध

दादरमध्ये महायुतीची ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रा

[caption id="attachment_1071602" align="aligncenter" width="800"] दादर येथे आयोजित ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रेचे नेतृत्व करताना मुख्यमंत्री

दिवाळीत प्रदूषणमुक्तीचा सल्ला देणाऱ्यांच्या तोंडाला ईद, मोहरमवेळी कुलूप का? - मंत्री नितेश राणे यांचा सवाल

मुंबई : दिवाळीत फटाके न फोडण्याचे आणि ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन करणारा अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडिओ

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत उद्या 10 तास पाणी पुरवठा बंद, ऐरोलीसह वाशी अन्... परिसरांना बसणार फटका

नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये 3 नोव्हेंबर अर्थात उद्या सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत अशा 10

मेरिटाईम क्षेत्रात महाराष्ट्र देशातील सर्वाधिक गुंतवणूकदारस्नेही राज्य - मंत्री नितेश राणे यांचा विश्वास

मुंबई : "जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि बंदर विकास क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील आघाडीचे केंद्र बनविण्याच्या