श्रीगोंद्यात महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

श्रीगोंदा : सुरोडी (ता. श्रीगोंदा) येथील मिनाक्षी रामदास सकट (वय ३८ ) यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला . मिनाक्षी यांनी प्रसंगावधान राखत मुलासह रस्त्यावरून पळ काढत आपला जीव वाचवला . या घटनेत त्यांची दुचाकी गाडी जळून खाक झाली .


याबाबत मिनाक्षी सकट यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या रविवार, दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे ८.१० वाजता आपला मुलगा सार्थक याच्यासह स्वतःच्या हिरो-होंडा प्लेझर स्कुटीवरून वडाळी रोडने घरी परतत असताना पोटे मळ्याजवळील कच्च्या रस्त्यावर ही घटना घडली.

त्यावेळी अंधारात एक इसम टॉर्च चमकवत असल्याने त्यांची गाडी घसरली. लगेचच गावातील ओळखीचा शरद लाटे हा धावत आला. त्याने हातातील बाटलीतील पेट्रोल मिनाक्षी यांच्या अंगावर आणि स्कुटीवर फेकले. तसेच केस धरून मारहाण केली व "माझ्यावर दाखल केलेली केस मागे घे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही" अशी धमकी दिली.


यानंतर आरोपीने माचीसची काडी पेटवून त्यांच्या अंगावर फेकली. मिनाक्षी सकट यांनी प्रसंगावधान राखत बाजूला पळ काढल्याने त्या वाचल्या, मात्र पेटलेली काडी त्यांच्या स्कुटीवर पडून स्कुटी जळून खाक झाली. यावेळी त्यांच्या साडीला देखील आग लागली , मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत जळणाऱ्या वस्त्रांवर हाताने झटके देऊन आग विझवली.


घटनास्थळावर मोठ्या आवाजात आरडाओरडा सुरू झाल्याने आरोपी शरद लाटे हा घटनास्थळावरून पळाला व एका अनोळखी इसमाच्या मोटारसायकलवर बसून सुरोडी रोडच्या दिशेने फरार झाला.


मीनाक्षी सकट या मातंग समाजातील असून, ग्रामसभेत जातीवरून अपमानित करणे, त्यांच्या वडिलोपार्जित जागेत बेकायदेशीर अतिक्रमण करणे, तसेच पोकलेन लावून वाढदिवस साजरा करणे या कारणांवरून यापूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संदीप वागस्कर, विलास वागस्कर व शरद लाटे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा राग मनात धरूनच हा पेट्रोल हल्ला झाल्याचा आरोप आहे.


या प्रकरणी मिनाक्षी सकट यांनी शरद लाटे व एका अनोळखी इसमाविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. मिनाक्षी सकट ह्या विद्यमान सरपंच आहेत . त्यांच्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरणात आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis Farmer Visit: शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी; भाऊबीजेला अरुणाताईंची खास विनंती

Nagpur:  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संपूर्ण दिवसभर नागपूर येथील दुष्काळग्रस्त

शेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी केली शेतातील पिकांची पाहणी; कापूस व तूर पिकांच्या नुकसानी संदर्भात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

पावसाअभावी शेतातील कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे.

दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना उपमुख्यमंत्री शिंदे भावुक, म्हणाले, ''हीच खरी दिवाळी''

आपल्या लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांच्या मनात आशेचा दिवा लावणे हीच खरी दिवाळी असल्याचे मत

आयएसआयएस प्रकरणात पुण्यातील डॉक्टरला सहा वर्षांची शिक्षा, कोर्ट म्हणाले - समाजाला धडा मिळाला पाहिजे

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आयएसआयएसशी संबंधित प्रकरणात पुण्यातील एका डॉक्टरला विशेष न्यायालयाने सहा

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा, शेतातील विंधन विहिरींवरील बंदी हटवली; झाडे जगविण्यासाठी मोठी घोषणा

महाराष्ट्र: सध्या राज्यभरात आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यावर मात

दिवाळीत हुडहुडी भरणार की घामाघूम होणार? हवामानाबाबत आली अत्यंत महत्त्वाची अपडेट!

दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होत आहेत. एका बाजूला दिवसा कडक ऊन चटका देत असले, तरी