‘वराह भगवान' जयंती राज्यभरात साजरी व्हावी! मंत्री नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

२५ ऑगस्ट भाद्रपद शुद्ध द्वितीया हा दिवस राज्यभर वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करावा


शासनामार्फत जिल्हा पातळीवर व प्रमुख शहरांमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत


शाळा व महाविद्यालयांमध्ये वराह भगवानाच्या इतिहास व संदेशावर व्याख्याने आयोजित करावीत


मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा व भक्तीचे आयोजन करण्यात यावे


शाळा-महाविद्यालयांमध्ये व्याख्याने आयोजित करा


मुंबई : वराह देवाचे हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे, येत्या २५ ऑगस्ट रोजी त्यांची जयंती आहे. राज्यभर हा जयंती उत्सव अधिकृतरित्या साजरा व्हावा. या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यासाठी चार गोष्टींचा विचार व्हावा, अशी मागणी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


राज्यात वराह जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जावी यासाठी मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.


‘हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव हा तिसरा अवतार मानला जातो. या वसुंधरेचा वराह देव हा संवर्धक व रक्षक असून सर्व प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा आहे. २५ ऑगस्ट रोजी वराह जयंती येत असून, या दिनाचं धार्मिक तसंच सांस्कृतीक महत्व अपार आहे. वराह भगवानाच्या पूजनानं वसुंधरा, समाजात धर्म, सदाचार व पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते. हिंदू समाजात या जयंतीबद्दल मोठा आदरभाव असून, राज्यभर ही जयंती अधिकतरित्या साजरी व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.


शासन स्तरावर या दिवशी विशेष कार्यक्रम, प्रवचन, सांस्कृतिक उपक्रम तसंच मंदिरांमध्ये पूजा-अर्चा आयोजित केली जावी, यासाठी योग्य ती अधिसूचना देण्यात यावी’, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.




Comments
Add Comment

Devendra Fadnavis Farmer Visit: शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी; भाऊबीजेला अरुणाताईंची खास विनंती

Nagpur:  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संपूर्ण दिवसभर नागपूर येथील दुष्काळग्रस्त

शेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी केली शेतातील पिकांची पाहणी; कापूस व तूर पिकांच्या नुकसानी संदर्भात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

पावसाअभावी शेतातील कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे.

दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना उपमुख्यमंत्री शिंदे भावुक, म्हणाले, ''हीच खरी दिवाळी''

आपल्या लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांच्या मनात आशेचा दिवा लावणे हीच खरी दिवाळी असल्याचे मत

आयएसआयएस प्रकरणात पुण्यातील डॉक्टरला सहा वर्षांची शिक्षा, कोर्ट म्हणाले - समाजाला धडा मिळाला पाहिजे

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आयएसआयएसशी संबंधित प्रकरणात पुण्यातील एका डॉक्टरला विशेष न्यायालयाने सहा

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा, शेतातील विंधन विहिरींवरील बंदी हटवली; झाडे जगविण्यासाठी मोठी घोषणा

महाराष्ट्र: सध्या राज्यभरात आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यावर मात

दिवाळीत हुडहुडी भरणार की घामाघूम होणार? हवामानाबाबत आली अत्यंत महत्त्वाची अपडेट!

दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होत आहेत. एका बाजूला दिवसा कडक ऊन चटका देत असले, तरी