राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन गणपतीपूर्वी होणार

राज्य सरकारने सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. पुढील आठवड्यापासून सुरू होणार्‍या गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना ऑगस्ट 2025 या महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार ऑगस्ट महिन्याचे वेतन कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात 26 ऑगस्टला जमा केले जाणार आहे. येत्या 27 ऑगस्टला लाडक्या बाप्पांचे आगमन होत आहे. गणेशोत्सवाची धामधूम लक्षात घेता सरकारने कर्मचार्‍यांना त्यांचे मासिक वेतन सहा दिवस आधीच देण्याचे ठरवले आहे.

या निर्णयाचा लाभ सरकारी कर्मचार्‍यांसह सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यता आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषिक विद्यापीठे, कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे. यासंदर्भात वित्त विभागाने गुरुवारी शासन निर्णय जारी केला आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis Farmer Visit: शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी; भाऊबीजेला अरुणाताईंची खास विनंती

Nagpur:  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संपूर्ण दिवसभर नागपूर येथील दुष्काळग्रस्त

शेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी केली शेतातील पिकांची पाहणी; कापूस व तूर पिकांच्या नुकसानी संदर्भात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

पावसाअभावी शेतातील कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे.

दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना उपमुख्यमंत्री शिंदे भावुक, म्हणाले, ''हीच खरी दिवाळी''

आपल्या लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांच्या मनात आशेचा दिवा लावणे हीच खरी दिवाळी असल्याचे मत

आयएसआयएस प्रकरणात पुण्यातील डॉक्टरला सहा वर्षांची शिक्षा, कोर्ट म्हणाले - समाजाला धडा मिळाला पाहिजे

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आयएसआयएसशी संबंधित प्रकरणात पुण्यातील एका डॉक्टरला विशेष न्यायालयाने सहा

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा, शेतातील विंधन विहिरींवरील बंदी हटवली; झाडे जगविण्यासाठी मोठी घोषणा

महाराष्ट्र: सध्या राज्यभरात आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यावर मात

दिवाळीत हुडहुडी भरणार की घामाघूम होणार? हवामानाबाबत आली अत्यंत महत्त्वाची अपडेट!

दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होत आहेत. एका बाजूला दिवसा कडक ऊन चटका देत असले, तरी