३९९ बिनातिकीट रेल्वे प्रवाशांवर कारवाई

भुसावळ विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम : २ लाख ३७ हजार ७१० दंड वसूल


नाशिक : भुसावळ विभागातील भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, खंडवा, अकोला व बडनेरा या स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. ३९९ बिनतिकीट प्रवासी आढळून आले असून, त्यांच्याकडून २ लाख ३७ हजार ७१० इतका दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांना सुरक्षित, सुकर व आरामदायक प्रवास सुविधा देण्याच्या आपल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, भुसावळ विभागात नियमितपणे मेल-एक्सप्रेस, पॅसेंजर, विशेष ट्रेनमध्ये व्यापक तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे.


अनधिकृत प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी, मुख्यालय तसेच सर्व विभागांमध्ये नियमितपणे विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. यामध्ये स्थानक तपासणी , अचानक धाड तपासणी (ॲम्बुश तपासणी), किल्लाबंदी तपासणी (फोर्ट्रेस चेक), व्यापक तपासणी ( इंटेंसिव चेक्स) आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमा यांचा समावेश आहे.


भुसावळ विभागातील भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, खंडवा, अकोला व बडनेरा या स्थानकांवर दि. २८ ऑगस्ट रोजी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तिकीट तपासनीस, वाणिज्य पर्यवेक्षक तसेच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) अशा एकूण ७३ कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. रेल्वे अनियमित प्रवास रोखण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभव सुनिश्चित करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली आहे. भुसावळ विभाग प्रवाशांना आवाहन करते कि, प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकीट खरेदी करून प्रवास करावा.


Comments
Add Comment

Nashik Crime : सैराटची पुनरावृत्ती ! त्र्यंबकेश्वरमध्ये प्रेमप्रकरणातून 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, संशयित ताब्यात

Nashik Crime : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे प्रेमसंबंधांच्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणात मोठी अपडेट ! माजी खासदार-नगरसेवकासह 11 जणांवर खटला, नव्या संशयितांविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल

Nashik TCS Case : नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित तरुणीच्या विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या आरोपांप्रकरणी

Nashik : दिवाळी-भाऊबीजसाठी रेल्वेचा मोठा दिलासा ! भुसावळ-देवळालीदरम्यान 4 विशेष मेमू फेऱ्या; जळगाव, मनमाड, नाशिक रोडला थांबा

दिवाळी आणि भाऊबीज सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वेचा मोठा प्लॅन ! 24 विशेष गाड्या धावणार, नाशिकमधील पाच स्थानकांचा होणार कायापालट

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने भाविकांच्या सोयीच्या

Nashik : दिवाळीपूर्वी 207 भूमिहीन कुटुंबांना हक्काच्या घरासाठी मिळणार स्वतःची जागा

नाशिक : कित्येक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या जागेअभावी घरकुलापासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागातील

Nashik : देवळाली कॅम्प येथे 13 नोव्हेंबर रोजी तोफखाना सराव, नाशिक व इगतपुरी तालुक्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा

Nashik : देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वतीने शुक्रवार १३ नोव्हेंबर २०२६ रोजी तोफखाना व मैदानी