अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने


अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व वायू प्रदूषणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण आणि नव्या विस्तारलेल्या निवासी भागांमध्ये रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये आणि हवेत मोठ्या प्रमाणात विषारी रसायने सोडण्यात येत आहेत. या प्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडली आहे असा सूर स्थानिकांचा आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) वारंवार तक्रारी देऊनसुद्धा केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.


बदलापूर शहरातही औद्योगिक वसाहतींमधून सोडला जाणारा रासायनिक वायू नागरिकांच्या जीवावर उठला आहे. काही वर्षांपासून अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती स्थायिक झाली. नैसर्गिक नाल्यांमध्ये प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जाते. कंपनीतून रासायनिक वायू हवेत सोडला जातो. अनेक वर्षांपासून येथील औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद होते. त्यात प्रक्रिया केली जात नसल्याची ओरड होती. अद्यापही त्यावर ठोस तोडगा काढण्यात आलेला नाही.


एमआयडीसीमध्ये शेकडो रासायनिक कंपन्या :


अंबरनाथमध्ये आनंद नगर, मोरीवली आणि वडोली या तीन तर बदलापुरात खरवई येथे औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) आहेत. या भागात शेकडो रासायनिक कंपन्या कार्यरत आहेत. पंधरवड्यापूर्वीच चिखलोली धरणात रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले होते. ज्यामुळे धरणातील पाणी दूषित होऊन हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. दुसरीकडे, मोरीवली, वडोली आणि बदलापुरातील खरवई भागातील कंपन्या मोठ्या प्रमाणात रासायनिक धुर सोडत आहेत. त्यामुळे नागरिकांना श्वसनविकार होत आहे.


दारे खिडक्या बंद ठेवाव्या लागतात :


अंबरनाथच्या बी कॅबिन, मोरीवली पाडा, ग्रीन सिटी तसेच बदलापुरातील पूर्वेतील विविध भागातील रहिवाशांना रासायनिक वायूंच्या प्रचंड प्रदूषणामुळे दारे-खिडक्या बंद ठेवून राहावे लागत आहे. गर्भवती महिला, श्वसनाचे आजार असलेले रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका सहन करत आहेत. नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असल्या तरी, कंपन्यांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही.


विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ


मोरीवली औद्योगिक वसाहतनजीक परिसरात तीन नामांकित शाळा असून येथे हजारों विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळा रासायनिक कंपन्यांपासून जवळ असल्याने, प्रदूषणाचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये पाणी व वायू प्रदूषणाचा प्रश्न उग्र बनला आहे. या कंपन्या बिनधास्त प्रदूषण करत आहेत. याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी जयंत कदम यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Comments
Add Comment

Thane News: दिवाळी पहाटनिमित्त ठाणे शहरामध्ये 'या' प्रमुख मार्गांवर प्रवेश बंदी, पर्यायी मार्ग कोणते?

ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये आणि ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर

Thane News: मुंब्रातील धक्कादायक घटना, नवजात बाळाची अडीच लाखांमध्ये विक्री; पोलिसांनी होमगार्डसह 10 जणांना ठोकल्या बेड्या

ठाणे: ठाण्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुंब्रा परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी अवघ्या 20

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

Thane News Today : ठाणे : उथळसर येथील धोकादायक इमारतीतील बंद गाळ्याला आग

ठाणे : ठाण्यातील गजबजलेल्या उथळसर परिसरात एक मोठी दुर्घटना टळली आहे. येथील डॉ. आंबेडकर रोडवर, प्रतीक्षा टॉवरजवळ

अखेर अंधार संपला! केडीएमसीच्या दिवाळी गिफ्टने टिटवाळ्यातील आदिवासी पाडे उजळले!

कल्याण : वर्षानुवर्षे अंधारात जीवन जगणाऱ्या टिटवाळ्यातील आदिवासी पाड्यांवर अखेर प्रकाशाची किरणे पोहोचली आहेत.

TMC News: पेन्शनधारकांसाठी आता घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा ‘TMC Life Certificate Digital System’ ॲपचा शुभारंभ

TMC News: ठाणे महानगरपालिका हद्दीतील पेन्शनधारकरांसाठी आनंदाची बातमी! सेवानिवृत्त पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र