TMC News: पेन्शनधारकांसाठी आता घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा ‘TMC Life Certificate Digital System’ ॲपचा शुभारंभ

ठाणे महानगरपालिका हद्दीतील पेन्शनधारकरांसाठी आनंदाची बातमी! सेवानिवृत्त पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता बँकांमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. कारण ठाणे महानगरपालिकेने, बँक ऑफ महाराष्ट्र आणि भारतीय स्टेट बँक यांच्या संयुक्त सहकार्याने ‘TMC Life Certificate Digital System’ या डिजिटल ॲपचा शुभारंभ करण्यात आला.

TMC News: ठाणे महानगरपालिका हद्दीतील पेन्शनधारकरांसाठी आनंदाची बातमी! सेवानिवृत्त पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता बँकांमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. कारण ठाणे महानगरपालिकेने, बँक ऑफ महाराष्ट्र आणि भारतीय स्टेट बँक यांच्या संयुक्त सहकार्याने ‘TMC Life Certificate Digital System’ या डिजिटल ॲपचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे पात्र पेन्शनधारकांना आता घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. या महत्त्वपूर्ण डिजिटल सुविधेचा शुभारंभ आज आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आला.


दरवर्षी सेवानिवृत्त पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँका अथवा संबंधित कार्यालयांमध्ये जावे लागते. यासाठी होणारा प्रवास, बँकांमधील गर्दी, रांगेत उभे राहण्याची वेळ, प्रतीक्षा तसेच ज्येष्ठ नागरिकांना इतरांवर अवलंबून राहावे लागण्याचा त्रास लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेने हा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. या प्रणालीमुळे पारंपरिक ऑफलाइन प्रक्रियेतील अनेक अडचणी दूर होऊन पेन्शनधारकांना अधिक सुलभ आणि सोयीस्कर सेवा उपलब्ध होणार आहे.



महानगरपालिका प्रशासनालाही प्राप्त प्रमाणपत्रांचे डिजिटल स्वरूपात संकलन, पडताळणी आणि व्यवस्थापन करणे आता सुलभ होणार आहे. परिणामी, यामुळे प्रशासकीय कामकाजात अधिक सुसूत्रता, पारदर्शकता आणि गतिमानता येण्यास मदत होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक, सुलभ व आधुनिक सेवा देण्याच्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ज्येष्ठ नागरिकांचा वेळ, श्रम आणि अनावश्यक धावपळ वाचविण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.


सदर कार्यक्रमास सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संखे, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दीपक शिंदे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांच्यासह बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Add Comment

SRA Redevelopment Mumbai: एसआरए प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प सरसावणार; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : सह्याद्री अतिथीगृह येथे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची 45 वी बैठक आज उपमुख्यमंत्री एकनाथ

Census Training Maharashtra: जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी ४ दिवसीय प्रशिक्षण; राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे दोन सत्रांमध्ये आयोजन

मुंबई: राज्यात सगळीकडे जनगणनेचे काम मोठ्या प्रमाणावर व जलद गतीने सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या

Celebrate Diwali with farmers: शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

नागपूर : राज्यात एकीकडे दिवाळीचे वातावरण तर दुसरीकडे शेतकरी बांधवांची दुष्काळी परिस्थिती,अशा वेळी त्यांना आधार

Shivsena Diwali: शिवसेनेकडून 7 लाख 69 हजार दिवाळी शिधांचे वितरण; शेतकऱ्यांसाठी शिवसेनेच्या शाखा बनणार ‘शेतकरी सेवा केंद्र’

Shivsena Diwali: प्रत्येक शेतकऱ्याला संकटात मदत करण्याच्या उद्देशातून शिवसेनेकडून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना

Election commission of India SSR Process: 6 राज्यांत सुरु होणार SSR प्रक्रिया; केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा

Election commission of India SSR Process: केंद्रीय निवडणूक आयोगाने सहा राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार याद्यांच्या विशेष

Diwali 2026: दिवाळीत तुम्ही भेसळयुक्त मिठाई तर नाही खात आहात ना? मिठाई खरेदी 'या' गोष्टी एकदा नक्की तपासा

Diwali 2026: दिवाळीचा सण म्हणजे रोषणाई, फराळ, मिठाई, फटाके. फराळासोबतच मिठाईचीही रेलचेल आपल्या प्रत्येकाच्या घरी असते.