चॅटबॉट स्कॅम्स हा २०२५ चा सर्वात लक्षणीय डिजिटल धोका: क्विक हील

गुन्हेगार बँका, डिलिव्हरी सर्व्हिसेस, सरकारी एजन्सीची हुबेहूब नक्कल करून करतात फसवणूक


मोहित सोमण:भारतातील सायबरक्राइमच्या चित्राचा चेहरामोहराच बदलून टाकत असलेल्या एआय-संचलित चॅटबॉट घोटाळ्यांच्या वेगाने पसरण्याविषयी काही अस्वस्थ करणारी माहिती जागतिक स्तरावर सायबरसिक्युरिटी उपाययोजना पुरविणारी कंपनी क्वि क हील टेक्नोलॉजीज लिमिटेडने उघडकीस आणली आहे.चॅटबॉट स्कॅम्स हा २०२५ चा सर्वात लक्षणीय डिजिटल धोका ठरल्याचे निदर्शनास आले आहे.माहितीनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक सफाईदार होत असताना गुन्हेगार बँका, डिलिव्हरी स र्व्हिसेस आणि सरकारी एजन्सीस सारख्या विश्वासार्ह ब्रॅण्ड्सची अभूतपूर्व अशा अचूकतेने नक्कल करत एकाचवेळी हजारो लोकांना फसवू शकतील अशा स्वयंचलित घोटाळ्यांचे कारखाने चालविण्यासाठी पूर्व-प्रशिक्षित लॅग्वेज मॉडेल्सचा गैरवापर करत आहेत.


अहवालानुसार, सिक्युरिटी लॅब्जना आताच दर महिन्याला एआय-फ्रॉडची हजारो नवीन साधने सापडत असल्याचे भारताचे सर्वात मोठे मालवेअर विश्लेषण केंद्र, सेकराइट लॅब्जमधील रिसर्चर्सनी हाती घेतलेल्या एका सर्वसमावेशक तपासणीमधून उघड झाले आ हे व चॅटबॉट स्कॅम्स हा २०२५ चा सर्वात लक्षणीय डिजिटल धोका ठरला आहे. पारंपरिक फिशिंग घोटाळ्यांच्या तुलनेत या स्वयंचलित यंत्रणांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या रिअल-टाइममध्ये चाललेल्या संवादाशी जुळवून घेऊ शकतात, आणि फसविल्या जाणाऱ्या व्यक्ती च्या प्रतिसादांच्या आधारे खोट्या डिलिव्हरी फीपासून ते ग्राहकांना खोटा दंड लागू करण्यापासून किंवा फसवी तांत्रिक मदत पुरविण्यापर्यंत कोणतेही विषयांतर करू शकतात. ही औद्योगिक स्तरावरची स्वयंचलित यंत्रणा एकाच सर्व्हरवरून एकावेळी हजारो फस वे संवाद घडवून आणू शकते.


संवादात्मक इंटरफेसवर लोकांनी स्वाभाविकपणे टाकलेल्या विश्वासाचा पिळवणूकीसाठी वापर करणाऱ्या घोटाळ्यांचे अनेक प्रभावशाली प्रकार क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडच्या विश्लेषणातून ओळखले गेले आहेत. खात्यामध्ये कुणीतरी अवैधरित्या शिरकाव केल्याच्या संशयासारख्या मुद्दामहून घडवून आणलेल्या समस्येदरम्यान नकली कस्टमर सपोर्ट चॅटबॉट्स प्रकट होतात आणि आपण वैध बँकिंग वेबसाइटवर नसल्याचे फसविल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या लक्षात येण्याच्या आधी त्यांच्या माहितीचे तपशील काढून घेतात. रोमान्स स्कॅम्सने नवे रूप धारण केले आहे व त्यात 'लोन्स' ची मागणी करण्याआधी किंवा फसविल्या जाणाऱ्या व्यक्तीला फसव्या क्रिप्टो एक्स्चेंजेसकडे वळविण्याआधीचे अनेक आठवडे एआय-निर्मित फोटोंचा साग्रसंगीत वापर असलेला भावनिक संवाद सुरू ठे वला जातो. व्हॉइस असिस्टंट घोटाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सापडललेल्या कुटुंबातील सदस्यांच्या आवाजाची नक्कल करण्यासाठी व्हॉइस क्लीनिंग तंत्रज्ञानाचा वापर करत निरुपद्रही अँप्सच्या मुखवट्यामागे लपून बदनामीकारक स्किल्स प्रसारित करतात.


गुन्हेगार एकसारख्या दिसणाऱ्या जसे की डीएचएल डॉटकॉम ऐवजी डीएचएआय डिलिव्हरीडॉटकॉम अशी नावे असलेल्या डोमेन्सची नोंदणी करतात आणि काही मिनिटांतच अधिकृत ब्रॅण्डच्या मालमत्ता काढून नेतात आणि आधीच्या घुसखोरीच्या वेळी मिळवि लेला डेटा वापरून फसविल्या जाणाऱ्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या नावाने अभिवादन करणारी आधीपासून तयार हॅण्डऑफ्स तयार करतात. फ्रॉडजीपीटीसारखी अंडरग्राऊंड एआय साधने सफाईदार फिशिंग किट्स निर्माण करतात आणि बँकिंगमध्ये लक्ष्य कराय च्या व्यक्तींसाठी औपचारिक, गेमिंगच्या चाहत्यांसाठी अनौपचारिक असा आवाजाचा लेहजा स्वीकारत स्पॅम फिल्टर्सच्या ओलांडून जाणाऱ्या पर्सनलाइझ्ड हल्ल्यांची रचना करतात. याची अलीकडेच आढळून आलेली उदाहरणे म्हणजे शंकाही येऊ नये अशा ट्रॅकिं ग इंटरफेसच्या माध्यमातून कस्टम फीजची मागणी करणारे डीएचएल-ब्रॅण्डेड तपशीलवार तयार केलेले चॅटबॉट्स, ‘मेटा सिक्युरिटी’ची छबी तंतोतंत वठवित पेजवरील वैयक्तिक माहिती आणि पेमेंट पद्धतींची माहिती चोरणारे व्हाट्सअँप बॉट्स आणि सवलती आ दींची फसवी माहिती देणारे कॉल्स करताना खोटी विश्वासार्हता तयार करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये पूर्वी कधीतरी केलेल्या घुसखोरीतून मिळालेले अचूक वैयक्तिक तपशील वापरणारे व्हॉइस क्लोनिंग स्कॅम्स.


यूजर्सनी ओळखायला हव्यात अशा धोक्याच्या चिन्हांमध्ये ओटीपी, बँकिंग माहिती किंवा पासवर्ड मागणाऱ्या कोणत्याही चॅटबॉटचा समावेश होतो. वैध फर्म्स असा संवेदनशील डेटा चॅट इंटरफेसच्या माध्यमातून गोळा करणे टाळतात. विचित्र व्याकरण वापरण्याची पद्धत, विचारपूर्वक चर्चा होणे टाळण्याच्या दृष्टीने तयार केलेली तातडीची भाषा वापरणे आणि चुकीची स्पेलिंग्ज असलेल्या संशयास्पद यूआरएलकडे वळविणे या सर्व संभाव्य फसवणुकीची सूचना देणाऱ्या खुणा आहेत. यूजर्सना अशाप्रकारचा एक जरी रेड फ्लॅग दिसला तरीही त्यांनी तत्काळ संवाद थांबवावा असा सल्ला क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेड देत आहे.


भोळेपणाने विश्वास ठेवणाऱ्या यूजर्सना अशाप्रकार धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी भारताची पहिली एआय-संचलित फसवणूक प्रतिबंधक उपाययोजना - क्विक हील अँटिफ्रॉडडॉटएआय आपले सतत बदलत राहणाऱ्या या धोक्यांच्या विरोधात बहु-स्तरीय संरक्ष ण पुरविते. ही क्लाउड-आधारित यंत्रणा प्रत्येक चॅट यूआरएलची धोक्याविषयी प्रत्यक्ष त्या वेळी मिळत असलेल्या गुप्त माहितीशी फेर-पडताळणी करते, फसवी डोमेन्स रिअल-टाइममध्ये ब्लॉक करते आणि यूजरच्या छेडछाड करण्यात आलेल्या वैयक्तिक माहि तीसाठी डार्क वेब बाजारपेठांवर देखरेख ठेवते. प्रगत वैशिष्ट्यांमध्ये ताबडतोब अलर्ट पोहोचवण्याची सोय असलेले फिशिंग डिटेक्शन, संशयास्पदरित्या मायक्रोफोन किंवा कॅमेरा सक्रिय झाल्याची धोक्याची सूचना देण्यासाठी अनधिकृत अँक्सेसवर देखरेख ठेव ण्याची सोय आणि ज्ञात डिजिटल फसवणूक पद्धतींच्या विरोधात अँड्रॉइड सिग्नेचर्सचे विश्लेषण करणारे फ्रॉड अँप डिटेक्शन यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Nashik : नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात परदेशी पाहुण्यांचे लवकर आगमन, दशकभरानंतर दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन

नाशिक : नाशिक जिल्ह्यात उन्हाचा कडाका जाणवत असतानाच महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

Kochi Mercedes Accident : कोची मर्सिडीज अपघात प्रकरण : न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाचा जामीन अर्ज फेटाळला; ५५ वर्षीय दुचाकीस्वाराच्या मृत्यूने केरळमध्ये संतापाची लाट

कोची : केरळमधील (Keral Accident News) एका अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांच्या १७ वर्षीय मुलाने चालवलेल्या भरधाव मर्सिडीज

Royal Enfield Himalayan: 450 नंतर आता 750cc चा थरार! रॉयल एनफील्डची नवी हिमालयन चर्चेत

भारतात रॉयल एनफील्डच्या (Royal Enfield) गाड्यांची क्रेझ काही वेगळीच सांगायला नको! 411cc आणि 452cc नंतर आता कंपनी ऑटो

महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये दिवाळी भेट; महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत एकूण २ हजार रुपयांची वाढ झाली मंजूर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने परस्पर निर्णय देत ३२ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा

4 वर्षांचा वनवास संपला! टीम इंडियात कमबॅक करताच भुवनेश्वर कुमारने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

वेलिंग्टन: भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर

Ramayan Movie : भारतीय सिनेमासाठी अभिमानाचा क्षण! नमित मल्होत्रा यांचा ‘रामायण’ १०० हून अधिक देशांमध्ये होणार प्रदर्शित

भारताचा इतिहास आणि संस्कृती पोहोचणार जगभरात भारताची कालातीत महागाथा, सांस्कृतिक वारसा आणि सभ्यतेची मुळे