मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे - पांजरापूर मधील येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ च्या ...
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी कामगार संघटनांनी मागील आठवड्यात केल्यानंतर मागील वर्षी दिलेल्या दिवाळी भेटीच्या रकमेत १ हजार रुपयांची वाढ सुचवत ३२ हजार रुपये एवढी रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकप्रतिनिधी यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर बुधवारी दुपारी गटनेत्यांची बैठक महापौर रितू तावडे यांनी बोलावली. या बैठकीत प्रशासनाने आणखी १ हजार रुपये वाढवून देण्यास संमती दिली. त्यामुळे अंतिमतः ३३ हजार रुपये एवढी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.