तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद


छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, गैरसोय टाळण्यासाठी दोन दिवसांकरिता व्हीआयपी आणि देणगी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


मंदिर संस्थानच्या प्रशासक तथा तहसीलदार माया माने यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रकानुसार, यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपन्न होत आहे. या काळात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांसह देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होतात.विशेषतः महोत्सवाच्या अखेरीस, सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ आणि मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणेच भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने मंदिर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


या निर्णयानुसार, दिनांक ६ आणि ७ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवशी ५०० रुपयांचे व्ही.आय.पी. संदर्भ दर्शन आणि १००० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेमंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जरी दोन विशेष दर्शन प्रकार बंद असले तरी, सर्वसामान्य भाविकांसाठी नियमित धर्मदर्शन (विनाशुल्क), मुखदर्शन आणि ३०० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पास पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. तसेच, घाटशीळ पार्किंग मार्गावरील वाहतूकही नियमितपणे सुरू राहील.सर्व भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दर्शनाचे नियोजन सुरळीत पार पडावे आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.


Comments
Add Comment

Census Training Maharashtra: जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी ४ दिवसीय प्रशिक्षण; राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे दोन सत्रांमध्ये आयोजन

मुंबई: राज्यात सगळीकडे जनगणनेचे काम मोठ्या प्रमाणावर व जलद गतीने सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या

Celebrate Diwali with farmers: शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

नागपूर : राज्यात एकीकडे दिवाळीचे वातावरण तर दुसरीकडे शेतकरी बांधवांची दुष्काळी परिस्थिती,अशा वेळी त्यांना आधार

Shivsena Diwali: शिवसेनेकडून 7 लाख 69 हजार दिवाळी शिधांचे वितरण; शेतकऱ्यांसाठी शिवसेनेच्या शाखा बनणार ‘शेतकरी सेवा केंद्र’

Shivsena Diwali: प्रत्येक शेतकऱ्याला संकटात मदत करण्याच्या उद्देशातून शिवसेनेकडून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना

मेक्सिकोचे विद्यार्थी पाथर्डीत! तिलोक जैन विद्यालयात जोरदार स्वागत; भारतीय नोकऱ्यांचे आकर्षण वाढणार?

पाथर्डी (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवर सर्व क्षेत्रांमध्ये बदलाचा वेग सध्या खूप वाढला आहे. जग झपाट्याने बदलत असून

160 Crore Package: आदिम जमाती आणि पारधी समाजासाठी 160 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज

मुंबई(सुहास शेलार): राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र 2047’ अंतर्गत कातकरी, कोलाम व माडिया या आदिम जमातींसह पारधी

एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये दिवाळी भेट! पात्र कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये सण उचल; महागाई भत्ता 60 टक्क्यांवर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी