मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी असेल यावर राज्य शासनाच्या वतीने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ०९ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडत ही चक्राकार पद्धतीने काढण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. पण या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग निवडणुकीत थेट विभाजन करेल. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग निवडणुकीत थेट निवडून येणारे दोनशे सत्तावीस पालिका सदस्य असतील. आणि महिलांकरीता तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यातील व्यक्तींकरीता महानगरपालिकेतील प्रभागांमध्ये पालिका सदस्यांच्या राखीव जागांचे वाटप करण्याच्या आणि त्या चक्रानुक्रमे फिरवण्याच्या संबंधात ही अधिसूचना जारी करून मुंबई महापालिकेला आदर्श कार्यप्रणाली नेमून दिली आहे.

ज्यामुळे आता आधी अनुसूचित जमाती.महिला आणि खुला प्रवर्गाच्या १७ जागा आणि अनुसूचित जमातीच्या ०२ जागा आणि इतर मागासवर्गीयांच्या ६१ जागा यांचे महिला आणि पुरुष असे आरक्षण काढले जाईल आणि त्यानंतर उर्वरित सर्वसामान्य गटातील प्रभागाचे आधी महिला प्रवर्ग यांचे आरक्षण काढून उर्वरित सर्व प्रभागखुला प्रभाग म्हणून जाहीर केला जाईल.

त्यामुळे पुढील आठवड्यात प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करून प्रभाग आरक्षण काढले जाईल. चक्राकार पद्धतीमुळे सध्या असलेले सर्व आरक्षित प्रभाग बदलले जातील. यंदा यापूर्वीचे चक्राकार पद्धत प्रभाग आरक्षण काढण्याची प्रथा बंद करून नव्याने प्रभाग आरक्षण काढले जाईल अशी चर्चा होती. पण आता चक्राकार पद्धतीनुसार आरक्षण काढले जाणार असल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
Comments
Add Comment

BMC New Building : मुंबई महापालिकेचे नवीन सभागृह 2029 मध्ये; टाऊन हॉल, जिमखान्यासह उभारणार नवी वास्तू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा

मुंबईतील 3,000 प्रदूषण मोजमाप LED फलकांची तपासणी होणार; महापालिकेचे थर्ड पार्टी ऑडिट

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हवेच्या

BMC News: महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह! सातही इमारतींमध्ये बसवणार नवी सुरक्षा प्रणाली

मुंबई (सचिन धानजी) : रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महापालिका रुग्णालयांचे ऑडीट

मुंबईत BMW कारचा थरार! महिला चालकाने अनेक वाहनांना उडवले; पोलिसांशीही घातली हुज्जत

मुंबईतील जुहू परिसरात एका महिला चालकाने आपल्या अलिशान कारने अनेक वाहनांना धडक देऊन अपघात घडवल्याची धक्कादायक

मध्य रेल्वेवरील 9 एक्स्प्रेसचा सुपरफास्ट दर्जा रद्द, तिकीट दरातही होणार कमी

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने नऊ सुपरफास्ट

कोठडीतील मृत्यू प्रकरणांत वारसांना पाच लाखांची भरपाई, राज्य सरकारचे नवे धोरण लागू

मुंबई: पोलीस कोठडीत मारहाण, अत्याचार किंवा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना