Madhya Pradesh : भयंकर! कफ सिरप दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशातील रुग्णालयात औषधात आढळल्या 'अळ्या'

ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयातील औषधांचा साठा सील


मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात 'टॉक्सिक कफ सिरप'मुळे (Toxic Cough Syrup) झालेल्या बालमृत्यूंच्या घटनेनंतर, आता ग्वाल्हेर येथील एका सरकारी रुग्णालयात औषधाच्या बाटलीत 'अळ्या' (Worms) आढळल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. गुरुवारी (१६ ऑक्टोबर २०२५) अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.


ग्वाल्हेर जिल्ह्यातील मोरार शहरातील सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका बालकाला हे औषध देण्यात आले होते. ज्या महिलेच्या मुलाला हे औषध देण्यात आले होते, तिने तक्रार केल्यानंतर तातडीने रुग्णालयातील 'अ‍ॅझिथ्रोमायसिन' (Azithromycin) प्रतिजैविक (Antibiotic) औषधाचा संपूर्ण साठा सील करण्यात आला आहे. तसेच, तपासणीसाठी या औषधांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अ‍ॅझिथ्रोमायसिन ओरल सस्पेन्शन हे औषध लहान मुलांना विविध संसर्गांवर (Infections) उपचारांसाठी सामान्यतः दिले जाते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे औषध जेनेरिक (Generic) होते आणि एका मध्य प्रदेश-स्थित कंपनीने त्याची निर्मिती केली होती.



३०६ बाटल्या जप्त, तपास सुरू


ड्रग इन्स्पेक्टर अनुभूती शर्मा यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, "मोरार येथील सरकारी रुग्णालयात एका महिलेने अ‍ॅझिथ्रोमायसिन ओरल सस्पेन्शनच्या बाटलीत अळ्या असल्याची तक्रार केली." त्यांनी पुढे स्पष्ट केले, "जरी महिलेने आणलेली औषधाची बाटली उघडलेली असली तरी, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात आली." मोरार येथील रुग्णालयात वाटप करण्यात आलेल्या आणि साठवलेल्या या औषधाच्या सर्व ३०६ बाटल्या त्वरित परत मागवण्यात आल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत.


शर्मा यांनी सांगितले की, काही औषधांच्या बाटल्यांची प्राथमिक तपासणी केली असता, कीटक आढळल्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत, परंतु प्रयोगशाळेत तपासणी करणे आवश्यक आहे. या औषधांचे काही नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत आणि या औषधाचा एक नमुना कोलकाता येथील सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीमध्ये देखील पाठवण्यात येणार आहे.



पूर्वीच्या दुर्घटना आणि WHO चा इशारा


विशेष म्हणजे, यापूर्वी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात भेसळयुक्त कोल्ड्रीफ (Coldrif) कफ सिरपच्या सेवनामुळे मूत्रपिंड निकामी (Renal Failure) झाल्याच्या संशयावरून २४ बालकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील तीन "सबस्टँडर्ड" ओरल कफ सिरप्स कोल्ड्रीफ (Coldrif), रेस्पीफ्रेश टीआर (Respifresh TR) आणि रिलाइफ (ReLife) यांच्या विरोधात सतर्कतेचा इशारा जारी केला होता. या पार्श्वभूमीवर, आता सरकारी रुग्णालयात औषधांमध्ये अळ्या आढळल्याच्या घटनेने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात