गुजरातचा नवा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा; रिवाबा जाडेजासह २५ जणांना मंत्रीपदाची शपथ

गुजरात: गुजरातच्या राजकारणात एका नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा भाग म्हणून नवीन मंत्र्यांचा शपथविधी समारंभाला आज सकाळी ११:३० वाजता सुरुवात झाली. या भव्य समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.



राजकीय वातावरणात नवी खळबळ


मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात सरकार या मंत्रिमंडळ विस्तारासाठी सज्ज झाले आहे. यावेळी मंत्रिमंडळात कोणत्या चेहऱ्यांचा समावेश केला जाईल याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.


गुजरातचे मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला हे लक्षात घेतले पाहिजे. यामुळे गुजरातमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले. एकाच वेळी एकूण १६ मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यांनतर नवीन मंत्रिमंडळ स्थापना होईल. ४-५ जुन्या मंत्र्यांची पुनरावृत्ती होऊ शकते अशी चर्चा आहे. मंत्रीमंडळात अनेक नवीन चेहरे देखील दिसू शकतात.



मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली


गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत पटेल यांची भेट घेतली आणि त्यांना गुजरात मंत्रिमंडळाच्या सध्याच्या स्थितीची माहिती दिली आणि नवीन मंत्रिमंडळ सदस्यांसाठी शपथविधी समारंभ आयोजित करण्याची परवानगी मागितली.



२५ मंत्री घेऊ शकतात शपथ


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात मंत्रिमंडळात २५ मंत्री शपथ घेणार आहेत. या मंत्र्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.




  • रिवाबा जाडेजा

  • त्रिकम छंगा

  • प्रवीणकुमार माली

  • ऋषिकेश पटेल

  • दर्शन वाघेला

  • कांतिलाल अमृतिया

  • कुंवरजी बावलिया

  • स्वरूपजी ठाकोर

  • अर्जुन मोढवाडिया

  • डॉ. प्रद्युम्न वाजा

  • कौशिक वेकारिया

  • परषोत्तम सोलंकी

  • रमणभाई सोलंकी

  • कमलेशभाई पटेल

  • संजयसिंह महीदा

  • पीसी बरंडा

  • रमेशभाई कटारा

  • मनीषा वकील

  • ईश्वरसिंह पटेल

  • प्रफुल्ल पंसेरिया

  • हर्ष संघवी

  • नरेश पटेल

  • कनुभाई देसाई

  • डॉ. जयरामभाई गामित


मंत्रिमंडळ विस्तारातील ५ ठळक मुद्दे



  • नवीन यादी तयार: मुख्यमंत्री पटेल यांनी बुधवारी राज्यपालांना नवीन मंत्र्यांची यादी सादर केली.

  • पहिला मोठा फेरबदल: २०२२ मध्ये भाजपच्या प्रचंड विजयानंतरचा हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे.

  • मंत्रिमंडळ मर्यादा: १८२ सदस्यांच्या विधानसभेत जास्तीत जास्त २७ मंत्री असू शकतात.

  • नवीन चेहरे: २२-२३ मंत्र्यांमध्ये फक्त ४-५ जुन्या चेहऱ्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.

  • उच्चपदस्थांची उपस्थिती: अमित शाह आणि जेपी नड्डा समारंभाला उपस्थित राहतील.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी