काय म्हणाले अमीत साटम?
“भारत तेरे तुकडे होंगे, इंशा अल्लाह, इंशा अल्लाह” आणि “अफझल हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं” या घोषणांचा उल्लेख करत अमीत साटम यांनी विरोधकांना धारेवर धरं.. या घोषणा नेमक्या कोणत्या विचारांचे प्रतिनिधित्व करतात आणि या घोषणांना नसीरुद्दीन शाह यांचे समर्थन आहे का? याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन आमदार अमीत साटम यांनी यावेळी केले. भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा काही आंतरराष्ट्रीय शक्तींना मान्य नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. देशांतर्गत विरोधक आणि काही भारतविरोधी शक्तींकडून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा साटम यांनी केला. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी न पडता वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
2 नोव्हेंबर रोजी शिवतीर्थ ते कामगार मैदान पदयात्रा
‘लोकतंत्र बचाओ. अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत सोमवार, दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता शिवतीर्थ, शिवाजी पार्क येथून कामगार मैदानापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून लोकशाही आणि संविधानाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्यात येणार असल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले. ही पदयात्रा शांततापूर्ण पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून, संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि समाजात जनजागृती हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पदयात्रेच्या समारोपानंतर उपस्थित प्रमुख नेत्यांपैकी एका नेत्याचे भाषण होणार आहे.
पुणे: पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री ...
दिशाभूल करणाऱ्या अपप्रचाराला चोख उत्तर देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये खरी वस्तुस्थिती पोहोचवण्यासाठी मुंबईसह राज्यभरात जिल्हा आणि विधानसभा स्तरावर 'प्रबुद्ध नागरिक संमेलने' घेतली जाणार आहेत. यासोबतच समाजात प्रभाव असणाऱ्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींशी थेट संवाद साधला जाईल. लोकशाही प्रक्रियेबद्दल सजगता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे, असं साटम यांनी स्पष्ट केले.
देशाच्या प्रगतीसाठी आणि 'विकसित भारत 2047' हे ध्येय गाठण्यासाठी समाजात शांतता, बंधुभाव आणि लोकशाही मूल्ये टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. भाषा, जात, प्रांत किंवा धर्माच्या नावावर समाजात फूट पाडणाऱ्या शक्तींना रोखणे हेच या मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचं ते पुढे म्हणाले.