IDBI Q2Results: आयडीबीआय बँकेचा तिमाही निकाल जाहीर बँकेच्या निव्वळ नफ्यात तब्बल ९८% वाढ 'या' कारणामुळे

मोहित सोमण:आयडीबीआय या आघाडीच्या खाजगी बँकेने इयर ऑन इयर बेसिसवर निव्वळ नफ्यात ९८% वाढ नोंदवली आहे. प्रामुख्याने बँकेने एनएसडीएल (NSDL) मधील आपला ११% स्टेक (भागभांडवल) विकल्याने बँकेला मोठा आर्थिक लाभ झाला. बँ केने त्यांच्या आयपीओमध्ये नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडमध्ये ११.१% हिस्सा असलेले २.२२ कोटींहून अधिक इक्विटी शेअर्स ७९९.८७ रुपये प्रति शेअर या इश्यू किमतीत ऑफर केले होते आणि १,६९८.९६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला हो ता, असे बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेला या तिमाहीत ३६२७ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील तुलनेत ९८% वाढ निव्वळ नफ्यात झाली आहे.


एलआयसीच्या अधिपत्याखाली असलेल्या बँकेने या तिमाहीत १८३६ कोटींचा नफा मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ८७५५ कोटींच्या तुलनेत बँकेच्या एकूण उत्पन्न (Total Income) ९५९४ कोटींवर पोहोचले आहे. तर बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात (Ope rating Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) गेल्या वर्षीच्या ३००६ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ३५२३ कोटीवर वाढ झाली आहे. बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेतही इयर ऑन इयर बेसिसवर सुधारणा झाली आहे. माहितीनुसार, जीएपीए (Gross Perform ing Assets NPA) गेल्या वर्षीच्या ३.६८% तुलनेत २.६५% वर या तिमाहीत पोहोचले. बँकेच्या निव्वळ एनपीएत (Net Non Performing Assets NPA) कुठलाही बदल झालेला नसल्याचे बँकेने आकडेवारीतून स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या १३१३ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत बँकेच्या इतर उत्पन्नात (Other Income) मध्ये ८९.५७% वाढ झाली ज्यामध्ये हे इतर उत्पन्न २४८९ कोटींवर पोहोचले आहे. बँकेच्या माहितीनुसार, व्याज उत्पन्न (Interest Income) हे मात्र इयर ऑन इयर बेसिसवर ४.५४% घसरले असून ७४४२ कोटीवरून ७१०४ कोटींवर पोहोचले.


बँकेच्या सीएआर (Capital Adequacy Ratio CAR) मध्ये सुधारणा झाली असून गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २१.९८% तुलनेत यंदा २५.३९% वर वाढले.

Comments
Add Comment

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

Nashik Accident News: भीषण अपघात! भरधाव कारची पोलिसांसह भाविकांना जोरदार धडक; पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथे रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री

Kolkata Stampede : कोलकाता दुर्गापूजा चेंगराचेंगरी प्रकरणात आयोजकांसह 7 जणांना अटक; घोषणेमुळे गर्दी उसळल्याचा दावा

Kolkata Stampede: पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे चोरबागान दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या