खासदारांची निवासस्थाने असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला भीषण आग

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना घडली. दिल्लीतील संसद भवनापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्सला आज भीषण आग लागली. डॉ. बिशंबर दास मार्गावर असलेल्या याच ब्रह्मपुत्र आपार्टमेंट्समध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील अनेक खासदारांची निवासस्थाने आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दुपारी १ वाजून २० मिनिटांमी मिळाली. आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली तरी सुदैवान कुठल्याही जीवितहानीचं वृत्त अद्याप हाती आलेलं नाही.



या घटनेमुळे रहिवशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीमुळे अधिकारी वर्गानेही चिंता व्यक्त केली आहे. ही आग कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्नाची शर्थ करण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची सहा वाहने तैनात करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

Anand Paranjape: महायुतीत समन्वयाची गरज; मित्र पक्षांनी परस्परांवर आरोप टाळावेत

ठाणे: महायुतीमधील घटक पक्षांनी समन्वयाची भूमिका ठेवावी आणि परस्परांवर आरोप करणे टाळावे, असे आवाहन शिवसेनेचे

Amit Satam : ‘बीडमध्ये लावलेली 2 लाख झाडे ठाकरे बंधूंनी दाखवावीत’; अमित साटम यांचे आव्हान

Political News: कर्जत येथील प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पावरून सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या वादात भाजपचे मुंबई अध्यक्ष

नसीरुद्दीन शाह 'सरफरोश'मधील 'गुलफाम हसन' प्रत्यक्षात उतरवत आहेत का?, अमीत साटम यांचा सवाल

भाजपा मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी विरोधकांच्या राजकारणावर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस आणि

राष्ट्रवादीत नाराजीचा सूर? झिशान सिद्दीकींच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर सिद्धार्थ कांबळेंचा राजीनामा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबईतील संघटनात्मक नियुक्तीवरून नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाचे राजकारण करणे दुर्दैवी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका

ठाणे : प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महायुतीतील मित्रपक्षांनी आत्मपरीक्षण करावं, शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांचं विधान

आगामी सर्व निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय अधिक सुकर करण्यासाठी आणि तिन्ही पक्षांमधील परस्पर संवाद अधिक दृढ