केरळच्या ६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा


नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः हवामान विभागाने केरळमधील ६ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा, वीजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा इशारा दिला आहे. याशिवाय, लक्षद्वीप आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हवामान विभागाने केरळच्या ६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि ८ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. एर्नाकुलम, इडुक्की, मल्लप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.शनिवारी उशिरा रात्रीपासून इडुक्की जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून, अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. केरळमधील नेदुमकंदम, कमिली आणि कट्टाप्पना या भागांत पूराचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. अनेक रस्ते तलावासारखे झाले असून बचाव कार्य सुरू आहे. लोकांना सुरक्षितरित्या राहत छावण्यांमध्ये हलवले जात आहे. मुल्लापेरियार धरणाचा पाण्याचा पातळी झपाट्याने वाढत आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.


केरळमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम तामिळनाडूवरही झाला आहे. मुल्लापेरियार धरणाचे 13 दरवाजे 100 सेंटीमीटरपर्यंत उघडण्यात आले असून, सुमारे 1400 क्यूसेक पाणी सोडले गेले आहे. याशिवाय, इतर तीन धरणांमधूनही पाणी सोडण्यात येत आहे. एर्नाकुलममध्ये संपूर्ण रात्र जोरदार पाऊस झाला. यामुळे एर्नाकुलम रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले आहे. आजूबाजूच्या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.


पूराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.खराब हवामान लक्षात घेता मच्छिमारांना 22 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


तामिळनाडूमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोयंबटूर जिल्ह्यातील डोंगराळ भाग, तसेच नीलगिरी, इरोड, तिरुप्पूर, थेनी, तेनकासी, तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी जिल्ह्यांमध्ये भारी ते अतिभारी पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि