Saturday, October 31, 2026

ऐरोली पुलावर बेस्ट बस-टेम्पोची धडक; ७ प्रवासी जखमी

मुंबई: ऐरोली पुलावर आज, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी १०:०५ वाजता बेस्ट बस आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात सात जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना त्वरित मुलुंड येथील वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयातील माहितीनुसार, सात जखमींपैकी दोघांना पुढील उपचारांसाठी पुरुष शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित पाच जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले. या अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >