रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अक्षर पटेलसह तळाचे फलंदाज चमकले; भारताने ऑस्ट्रेलियापुढे ठेवले एवढे मोठे आव्हान


अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पर्थमध्ये झालेला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने सात गडी राखून डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला. आता अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ५० षटकांत नऊ बाद २६४ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियापुढे ५० षटकांत २६५ धावा करण्याचे आव्हान ठेवले. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने ५९ वे तर श्रेयस अय्यरने २३ वे अर्धशतक केले. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर व्यतिरिक्त अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप, वॉशिंग्टन सुंदर यांनी झटपट धावा करुन सांघिक कामगिरीत महत्त्वाचे योगदान दिले.





कर्णधार शुभमन गिल नऊ धावा करुन आणि विराट कोहली शून्य धावा करुन परतल्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागिदारी रचली. रोहित आणि श्रेयस यांच्यामुळे भारताचा डाव सावरला. पण एका टप्प्यावर रोहित आणि श्रेयस बाद झाले. यानंतर अक्षरने सूत्रं हाती घेतली. नंतर तळाच्या फलंदाजांपैकी हर्षित राणा, अर्शदीप, वॉशिंग्टन सुंदर यांनी झटपट धावा वाढवल्या. यामुळे भारताने २५० धावांचा टप्पा ओलांडला.



भारताकडून रोहित शर्माने ९७ चेंडूत ७३ धावा, श्रेयस अय्यरने ७७ चेंडूत ६१ धावा आणि अक्षर पटेलने ४१ चेंडूत ४४ धावा केल्या. केएल राहुलने ११, वॉशिंग्टन सुंदरने १२, नितीश रेड्डीने ८, हर्षित राणाने नाबाद २४, अर्शदीपने १३, मोहम्मद सिराजने नाबाद शून्य धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून झम्पाने चार तर बार्टलेटने तीन आणि स्टार्कने दोन विकेट घेतल्या.





Comments
Add Comment

India A vs NZ A Test: कसोटी सामन्यात टीम इंडिया अडचणीत, जुरेलच्या शतकी झुंजार खेळीने वाचवला मान

क्राइस्टचर्चमधील ऐतिहासिक हॅगली ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या

WTC 2027: वेस्ट इंडिजने बांगलादेशला 8 विकेट राखून नमवलं, टीम इंडियाला थेट झाला फायदा

वेस्ट इंडिजचा संघ बांगलादेश दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत पहिला सामना ढाक्यात

Manisha Bhanwala : 'दंगल गर्ल' मनीषा भानवालाने रचला इतिहास; जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

Manisha Bhanwala : भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालाने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे.

आयपीएल 2027 स्पर्धेत पुन्हा एकदा रोहित पर्व! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर परतण्याची तयारी, झालं असं..

आयपीएल स्पर्धेत पाच वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सची कामगिरी गेल्या काही वर्षात निराशाजनक राहिली

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव कुठे झाला? कर्णधार श्रेयस अय्यरने असं फोडलं खापर

भारताने सलग तीन सामन्यात न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे चौथ्या टी20 सामन्यात

मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक गटात मोठे बदल; पोलार्डच्या नेतृत्वाखाली दिग्गज खेळाडूंची नवीन इनिंग सुरू

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक गटात मोठे आणि आश्चर्यकारक