तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र…


८५ लाखांची बक्षिसं!


मुंबई  : भारतातील तरुणांना एआय क्षेत्रात नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी 'युवा-एआय - ग्लोबल युथ चॅलेंज' ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जाहीर झाली आहे. १३ ते २१ वयोगटातील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ आहे. विजेत्यांना ८५ लाख रुपयांची पारितोषिके मिळतील. निवडलेल्या संघांना दिल्लीतील 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये आपले प्रकल्प सादर करण्याची संधी मिळेल.


या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून त्यात विद्यार्थांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धेसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असल्याचेही यूजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित होणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे आयोजन करण्यात येत आहे. १९ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या या परिषदेत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम्’ येथे होणाऱ्या या परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. परिषदेत जगभरातील राष्ट्रप्रमुख, धोरणकर्ते, संशोधक आणि तज्ज्ञ मंडळी सहभागी होणार आहेत.


हवामान बदल, शिक्षणातील समावेशकता, स्वच्छ ऊर्जा, स्मार्ट सिटी, आरोग्य, कृषी आणि वृद्धांच्या सेवेसाठी एआय-आधारित उपाय सुचवणाऱ्या विद्यार्थ्यांना या मंचावर विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आपले प्रकल्प जागतिक पातळीवर सादर करण्याची संधीही मिळणार आहे. या स्पर्धेसाठी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोफत प्रवास आणि निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.


‘युवा-एआय’ या स्पर्धेत एकूण ८५ लाखांची पारितोषिके देण्यात येणार असून, सर्वोत्तम तीन उपायांना प्रत्येकी १५ लाख रुपये, पुढील तीन उपायांना प्रत्येकी १० लाख रुपये, तर दोन विशेष पुरस्कार म्हणून ५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि विजेत्यांना विशेष सन्मानदेखील दिला जाणार आहे.
‘युवा-एआय’च्या माध्यमातून भारतात ‘एआय रेडी’ युवा पिढी घडविणे, नवकल्पक विचारांना चालना देणे आणि सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय शोधणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे यूजीसी सचिव प्रा. मनीष जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा