ताम्हिणी घाटात भीषण अपघात, दरड गाडीवर कोसळल्याने महिलेचा मृत्यू!

रायगड: सनरुफ असलेल्या आलिशान चारचाकीवर दरड कोसळल्याची घटना पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात घडली आहे. ही घटना आज सकाळी घडली असून यामध्ये ४३ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती आहे.


स्नेहल गुजराती आपल्या कुटुंबासोबत पुण्याहून माणगावच्या दिशेने प्रवास करत होत्या. यावेळी ताम्हिणी घाटात त्यांच्या गाडीवर दरड कोसळली. या दरडीमध्ये मोठा दगड थेट त्यांच्या गाडीवर आदळला. ज्यामुळे गाडीचे सनरूफ फुटल्याने दगड त्यांच्या डोक्यावर पडला. दरम्यान त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.




या अपघातामुळे आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दरड रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. प्रशासनाकडून नियमित साफसफाई व सूचना फलक लावले जात असले तरी पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''