‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी


जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत देशाच्या विविध भागांत प्रवासी सेवा देत असली तरी वंदे भारतच्या मेंटेनन्सबाबत रेल्वेकडून ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. वंदे भारतच्या देखभालीसाठी, डागडुजीसाठी ठरावीक ठिकाणी कार्यवाही होत असली तरी ही समस्या आता संपुष्टात येणार आहे. वंदे भारतच्या नव्या गाड्यांच्या देखभालीसाठी देशभरातील दिल्लीत दोन, मुंबई व बंगळूरु येथे प्रत्येकी एका अशा पाच ठिकाणी डेपोची उभारणी केली जात असून, त्यातील पहिला डेपो जोधपूर येथे आकार घेत आहे. लातूर येथील कारखान्यात २४ डब्यांची शयनयान श्रेणीतील ‘वंदे भारत’ गाड्यांची निर्मिती केली जात आहे.


दिवसभरात नऊ ‘वंदे भारत’ शयनयान श्रेणीतील गाड्यांची देखभाल या ठिकाणी केली जाणार आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत या डेपोच्या पहिल्या टप्प्याची उभारणी पूर्ण होणे अपेक्षित आहे. वंदे भारत ही आकाराने लांब आणि अतिवेगवान प्रकारात मोडणारी रेल्वे आहे. यामुळे तिच्या दुरुस्तीसाठी वेगळी यंत्रणा उभी करणे आवश्यक होते. अशी रेल्वे बनवण्यासोबतच तिच्या दुरुस्तीची यंत्रणा भारतीय रेल्वेने उभी केली ही गौरवास्पद बाब आहे.
- मेजर अमित स्वामी, वरिष्ठ यांत्रिकी अभियंता, जोधपूर रेल्वे विभाग

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि