Google Maps new features : हँड्स-फ्री ड्रायव्हिंग! जेमिनी AI सह गुगल मॅप्समध्ये १० नवीन फीचर्स; काय आहे खास? जाणून घ्या

नवी दिल्ली : तुमच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलण्यासाठी, गुगलने मॅप्समध्ये जेमिनी AI सह तब्बल १० नवीन फीचर्स जोडले आहेत. या नवीन फीचर्समुळे आता मॅप्स केवळ रस्ता दाखवण्याचे काम न करता, एक स्मार्ट सुविधा, सेफ्टी अलर्ट्स आणि नवीन ट्रॅव्हल मोड्स देणारे एक अष्टपैलू ॲप बनले आहे. या नवीन फीचर्समुळे तुम्ही फोनचा वापर न करता (हँड्स-फ्री) देखील मॅप्सला अनेक प्रश्न विचारू शकता आणि वेगवेगळ्या जागा शोधू शकता. या नवीन फीचर्सचा वापर कसा करायचा आणि ते काय काम करतात, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया...


१. हँड्स-फ्री कन्वर्सेशनल ड्रायव्हिंग (Hands-Free Conversational Driving)


तुम्ही गाडी चालवत असताना, आता तुम्ही जेमिनीच्या मदतीने व्हॉईस कमांड देऊ शकता. "या मार्गावर चांगले जेवण किंवा बजेट-फ्रेंडली रेस्टॉरंट कुठे आहे?" असे प्रश्न तुम्ही विचारू शकता. तसेच, EV चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी देखील याचा वापर करता येईल.

२. प्रोएक्टिव लोकल टिप्स (Proactive Local Tips)


हे फीचर तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन आणि रूट संबंधित स्थानिक माहिती देईल. तुमच्या आजूबाजूचे आकर्षण, स्थानिक दुकाने किंवा बेस्ट फूड स्पॉट्सची माहिती मिळेल. हे मागील वर्षी लाँच केलेल्या 'Inspirations' फीचरचे सुधारित व्हर्जन आहे.

३. ठिकाणांबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे (Answers to Place Queries)


तुम्हाला एखाद्या ठिकाणाबद्दल माहिती हवी असल्यास, दुसऱ्या ॲपवर जाण्याची गरज नाही. गुगल मॅप्समध्येच तुम्हाला संबंधित ठिकाणाचे रेटिंग, रिव्ह्यू, फोटो इत्यादीबाबत संपूर्ण माहिती त्वरित मिळणार आहे.

४. प्रोएक्टिव्ह ट्रॅफिक अलर्ट्स (Proactive Traffic Alerts)


ट्रॅफिक जाम किंवा रोड क्लोजरसारख्या महत्त्वाच्या माहितीचे अलर्टतुम्हाला या फिचरमध्ये मिळेल. प्रवास सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला ट्रॅफिकची माहिती मिळेल. (हे फीचर दिल्ली, मुंबई आणि बंगळूरूमधील अँड्रॉइड युजर्ससाठी लाँच करण्यात आले आहे.)

५. एक्सीडेंट-प्रोन एरिया अलर्ट्स (Accident-Prone Area Alerts)


हा फिचर अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती देणारा अलर्ट आहे. ड्रायव्हिंग करताना तुम्ही सावध राहू शकता. हा डेटा सरकारच्या सहकार्याने जोडला जाणार आहे. (हे फीचर सुरुवातीला गुरुग्राम, साइबराबाद, चंदीगड आणि फरीदाबादमध्ये उपलब्ध होणार आहे.)

६. ऑथॉरिटेटिव स्पीड लिमिट्स (Authoritative Speed Limits)


रस्त्यांचे सरकारी मान्यता प्राप्त स्पीड लिमिट्स मॅप्सवर दिसणार आहेत. यामुळे सुरक्षित ड्रायव्हिंगला प्रोत्साहन मिळेल. (हे फीचर नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, जयपूर, फरीदाबाद, लखनऊ, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद या ९ शहरांत सुरू करण्यात आले आहे.)

७. रीयल-टाइम रोड अपडेट्स (Real-Time Road Updates)


रस्ता बंद किंवा रस्त्याचे काम सुरू असल्याचे थेट अपडेट्स या फीचरमध्ये मिळतील. गुगल NHAI (नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया) सह मिळून हे अपडेट्स देणार आहे, ज्यामुळे युजर्स चांगला मार्ग निवडू शकतील.

८. मॅप्सवरून बुक करू शकता मेट्रो तिकीट (Metro Ticket Booking)


गुगल मॅप्सवरून थेट मेट्रो तिकीट बुक करण्याची सुविधा मिळणार. ही सेवा लवकरच दिल्ली, बंगळूरू, कोच्चि, मुंबई आणि चेन्नईमध्ये सुरू होणार आहे. युजर्स गुगल वॉलेटमध्ये तिकीट सेव्ह करू शकणार आहेत.

९. फ्लायओव्हर नेव्हिगेशनमध्ये व्हॉईस सपोर्ट (Voice Support for Flyover Navigation)


फ्लायओव्हरवर जायचे की नाही, या संभ्रमावर मात करण्यासाठी व्हॉईस सपोर्ट मिळेल. हे काम आवाजाद्वारे केले जाईल, ज्यामुळे तुम्हाला स्क्रीनकडे पाहण्याचीही गरज भासणार नाही आणि गोंधळ दूर होईल.

१०. कस्टम अवतार (Custom Avatar)


टू-व्हीलर आयकॉनला कस्टमाइज करण्याची सुविधा या फीचरमध्ये मिळेल. हे फीचर खास भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा टू-व्हीलर आयकॉन तुमच्या आवडीनुसार बदलू शकता.
Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी