दिल्ली स्फोटानंतर पाचशे मीटरवर सापडला तुटलेला हात, परिसरात भीतीचं वातावरण

दिल्ली : लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारबॉम्बच्या स्फोटाने संपूर्ण दिल्ली हादरली. सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या या स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला. स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की तीन दिवस उलटल्यानंतरही घटनास्थळाजवळ विखुरलेले अवशेष आणि शरीराचे तुकडे सापडत आहेत. लाल किल्ल्यापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या बाजारातील एका इमारतीच्या छतावर तुटलेला हात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली.


पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तो भाग बंद करून तपास सुरू केला. I20 कारमध्ये झालेल्या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक गंभीर जखमी आहेत. या स्फोटात आसपासच्या वाहनांचे आणि दुकानांचेही मोठे नुकसान झाले.


दरम्यान, मृतांच्या शवविच्छेदन अहवालातून स्फोटाची तीव्रता किती प्रचंड होती हे स्पष्ट झाले आहे. अनेक मृतांच्या हाडांचा चुराडा झाला असून डोक्याला आणि अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. स्फोटामुळे काहींचे कानाचे पडदे आणि फुफ्फुसे फुटल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. इतकंच नव्हे, तर शरीरातील रक्तस्राव आणि भिंतींवर आपटल्याने झालेल्या जखमांचेही ठसे आढळले.


या अहवालानंतर दिल्ली पोलिसांनी तपास अधिक गतीमान केला असून स्फोटाच्या मूळ कारणाचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे.

Comments
Add Comment

मुंबई- बेंगळुरू प्रवास आता सुस्साट, 988 Km चं अंतर फक्त 16 तासांत पूर्ण करता येणार

मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री- एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय ग्राहक व्यवहार- प्रल्हाद जोशी, अन्न

Vande Bharat Sleeper: रात्री वाराणसीला शांत झोपायचं अन् सकाळी दिल्लीत उठायचं! वंदे भारत स्लीपरचं पाहा संपूर्ण शेड्युल

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेकडून 'नाईट ट्रेन'ची घोषणा करण्यात आली होती. ही एक्स्प्रेस

Badrinath Helicopter Crash Update: बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये सहा जणांपैकी चौघांचा मृत्यू, दोन प्रवासी गंभीर जखमी

उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये बद्रीनाथ- डेहराडून दरम्यान धावणाऱ्या एका हॅलिकॉप्टरचा अपघात

Badrinath Helicopter Crash: मोठी दुर्घटना! बद्रीनाथहून निघालाले हेलिकॉप्टर जोशीमठमध्ये कोसळले, पायलटसह 6 जण बेपत्ता

उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम

Railway News: ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबईसह 8 शहरांमध्ये रेल्वेकडून थेट पार्सल घरपोच; स्टेशनवर जाण्याची कटकट गेली

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने आता नागरिकांच्या सेवेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय रेल्वेकडून आता

Kanpur Viral News: 'पहिली पूजा मीच करणार'...; करवा चौथच्या पूजेसाठी तीन पत्नींमध्ये पोलीस ठाण्यातच रंगली जुंपली

Kanpur Viral News: करवा चौथचा सण विवाहित महिलांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला दिवसभर