कसोटी सामन्यानंतर लगेचच भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका! दक्षिण आफ्रिकेच्या संघात होणार अनेक खेळाडूंचे पुनरागमन

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून गुवाहाटीमध्ये सुरूवात होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका सध्या १-० ने आघाडीवर आहे. तर ३० नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय सामनांची मालिका खेळवली जाणार आहे. या एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.


एकदिवसीय मालिकेत वेगवान गोलंदाज म्हणून ओळख असलेला कागिसो रबाडा खेळणार नाही. कारण कसोटी मालिकेपूर्वी सराव करताना रबाडाला दुखापत झाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन झाले आहे. नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये डिकॉकने उत्कृष्ट कामगिरी केली होती.


पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या लुहान डि प्रिटोरियसला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. तर एडन मार्करमचे टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. डोनोवन फरेराऐवजी मार्करम संघाचे नेतृत् करणार आहे. तर पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत न खेळलेला केशव महाराज भारताविरुद्ध वनडे खेळणार आहे. मागच्या वर्षी भारताविरुद्ध टी-20 विश्वचषकचा अंतिम सामना खेळल्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाचे सुद्धा टी-20 संघात पुनरागमन झाले आहे.




दक्षिण आफ्रिकेची एकदिवसीय मालिकेसाठी खेळाडू


टेम्बा बऊमा (कर्णधार), ओटिनिल बार्टमन, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डिकॉक, टोनी डि जॉर्जी, रुबिन हरमन, मार्को यानसन, केशव महाराज, एडन मार्करम, लुंगी एनगिडी, रियान रिकलटन, प्रेनेलन सुब्रायन




दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ


एडन मार्करम (कर्णधार), ओटिनिल बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डिकॉक, टोनी डी जॉर्जी, डोनोवन फरेरा, रिझा हेन्ड्रिक्स, मार्को यानसन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, ट्रिस्टन स्टब्स

Comments
Add Comment

Rohit Sharma : रोहित शर्माच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करू नका; जॉन्टी ऱ्होड्सचा बीसीसीआयला मोलाचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि धडाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या भविष्याबाबत आ

India A : न्यूझीलंड दौऱ्यावर भारत 'अ' संघ तीन चार-दिवसीय सामने खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघाचा २४ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणारा महत्त्वपूर्ण दौरा, युवा क्रिकेटपटूंना

ICC Test Rankings : गिल-बुमराहच्या क्रमवारीत घसरण, पडिक्कलची मोठी झेप

दुबई : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची घसरण झाली

Krunal Pandya : भारताच्या टी२० संघातून वगळल्यानंतर कृणाल पांड्या निराश

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघाच्या घोषणेपूर्वी, एका

China Masters : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात

शेन्झेन : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे चायना मास्टर्समधील आव्व्हान संपुष्टात आले आहे. लक्ष्यला कॅनडाच्या

Pakistan Cricket Crisis : पाकिस्तान क्रिकेटमध्ये २४ तासांत मोठी उलथापालथ; ७ खेळाडूंना मायदेशी पाठवलं, मिस्बाह-उल-हकचा राजीनामा

पाकिस्तान : पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या २४ तासांत घडलेल्या घटनांनी क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.