न्यूमोनियामुळे श्वसनप्रणाली बंद झाल्याने ‘शक्ती’ वाघाचा मृत्यू

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील शक्ती वाघाचा (वय ९ वर्षे सहा महिने) १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी मृत्यू झाला. ‘शक्ती’चा मृत्यू श्वसननलिकेत हाड अडकल्याने झाला नसून, न्यूमोनियाची बाधा झाल्यानंतर श्वसन प्रणाली बंद पडल्याने झाला; असे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आले. आता प्राणिसंग्रहालयात ‘जय’ हा वाघ (वय ३ वर्षे) आणि ‘करिश्मा’ ही वाघिण (वय साडेअकरा वर्षे) आहे.


छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातून १२ फेब्रुवारी २०२० रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात शक्ती (नर) आणि करिश्मा (मादी) ही रॉयल बंगाल वाघाची जोडी देवाण-घेवाण तत्त्वावर आणली होती. तेव्हापासून ही जोडी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे मुख्य आकर्षण ठरली होती. उद्यानात येणारे पर्यटक शक्ती व करिश्माला पाहण्यासाठी गर्दी करीत असत.


शक्ती वाघाने १५ नोव्हेंबर २०२५ रोजी अन्न ग्रहण केले नव्हते. त्यामुळे त्याला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. तसेच पाण्यातून औषधही देण्यात आले. यानंतर १६ नोव्हेंबर २०२५ रोजी शक्तीने कोंबडीचे थोडे मांस खाल्ले व पाणी प्यायले. त्यानंतर त्याला उलटीचा उमाळा (Retching) आला. यानंतर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोग्य तपासणी करण्यासाठी पिंजऱ्यात घेत असताना त्याला अचानक अपस्माराचे झटके (Convulsion) आले आणि दुपारी सव्वा बारा वाजता त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी शक्तीला कुठल्याही प्रकारच्या आजारपणाचे लक्षण नव्हते.


शक्तीच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी दुपारी अडीच वाजेपासून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (परळ) येथील पशुवैद्यकीय पॅथेलॉजी विभागातील प्रोफेसर आणि त्यांच्या चमूने त्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार शक्तीचा मृत्यू हा न्यूमोनियाची बाधा झाल्यानंतर श्वसन प्रणाली बंद पडल्याने झाला. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या कारणाचा अहवाल सादर केला जाईल, असे प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आले.


शक्ती वाघाच्या अवयवांचे नमुने नागपूर येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (गोरेवाडा) येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. शक्ती वाघाच्या मृत्यूची सविस्तर माहिती नियमानुसार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (Central Zoo Authority) आणि महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (Maharashtra Zoo Authority) यांना १८ नोव्हेंबर २०२५ रोजी ई-मेलद्वारे कळविण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयातील शिष्टाचारानुसार शक्ती वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्व मुंबईतील प्रमुख रस्ते धुळमुक्त? BMC ची विशेष स्वच्छता मोहिम

मुंबई (विशेष प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या दिवाळीपूर्व धूळ व वायुप्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा भाग म्हणून

मुंबईतील आरएमसी प्लांटवरील कारवाई मोहिमेला महापौरांच्या वॉर्डापासून सुरुवात; महापालिकेच्या एन विभागातील ७ प्लांटना नोटीस, कठोर कारवाईचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणाच्या

Mumbai News: क्रॉफर्ड मार्केटच्या ऐतिहासिक वास्तूचे आणि वारसा स्थळाचे महत्त्व जपा! महापौर रितू तावडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक व जागतिक

महाराष्ट्राची लोकसंस्कृती वर्षभर जपण्यासाठी ‘बाप्पाचा कट्टा’ सुरू; मुंबई-पुण्यात उद्यापासून ९० दिवसांचा सांस्कृतिक महाउत्सव!

मुंबई:

Matheran Toy Train Resumes: 'माथेरानची राणी' पुन्हा रुळावर धावणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली नेरळ- माथेरान मिनी ट्रेन आता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे

मुंबई लोकलचा अनोखा डबा! आता सामान्य तिकीट काढून घ्या फर्स्ट क्लासचा आनंद

मुंबई लोकल म्हटली की डोळ्यांसमोर येते ती अलोट गर्दी. या रोजच्या गर्दीतून थोडा दिलासा मिळावा म्हणून अनेक प्रवासी