मालाड आणि गोरेगावमधील दोन मनोरंजन मैदानांचा होणार विकास

गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान


सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार नुतनीकरण


मुंबई (विशेष प्रतिनिधी): गोरेगाव पहाडी गावमधील मोकळ्या जागेचा विकास करून त्याठिकाणी मनोरंजन मैदानाचा विकास केला जाणार आहे. याबरोबरच मालाड पश्चिम मधील आदर्श दुग्धालय मार्गावरील सरदार वल्लभभाई पटेल मनोरंजन मैदानाचेही नुतनीकरण केले जाणार आहे. या मोकळ्या जागेवर मैदानाचा विकास आणि मनोरंजन मैदानाचे नुतनीकरण आदींसाठी तबबल आठ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या 'पी/ दक्षिण विभागातील गोरेगांव पहाडी गांव न.भू.क्र. ५९६ (भाग) आणि ५९६ ई (भाग) हा मैदानासाठीचा आरक्षित भाग महापालिकेच्या ताब्यात असून या मोकळ्या जागेचा विकास केला जाणार आहे. यावर मैदानाचा विकास करताना त्याठिकाणी मुख्य प्रवेश द्वार सुरक्षा चौकी तसेच वीज मीटर खोली, मुख्य प्रवेश द्वाराजवळ सुशोभित भिंत, बांधणे, आवश्यक ठिकाणी पाय-यांची बांधणी, गजेबो, पदपथाचे बांधकाम, आकर्षक गोलाकार बैठक , लहान मुलांच्या खेळाच्या जागेमध्ये लाल माती , अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहीनीची दुरूस्ती , पदपथावर परगोला बांधणे तसेच विजेची आणि हिरवळीची, विद्युतीकरणाची व हिरवळीची कामे केली जाणार आहे.




तसेच पी/उत्तर विभागातील मालाड (प) येथील आदर्श दुग्धालय मार्गावरील न.भू.क्र. ६९अ/१अ या सरदार वल्लभभाई पटेल मनोरंजन मैदानाचे नुतनीकरणही करण्यात येणार आहे. या नुतनीकरणाच्या कामात प्राधान्याने मुख्य प्रवेशद्वार व सुरक्षा चौकी, गजेबोचे, अस्तित्वात असलेल्या संरक्षक भिंत, अस्तित्वात असलेल्या पदपथाची दुरूस्ती, अस्तित्वात असलेल्या कारंजे तोडून त्याजागी गजेबो चे बांधकाम, लहान मुलांच्या खेळाची साधने व टर्फ बसविणे तसेच विजेची आणि हिरवळीची कामे आदींचा समावेश आहे.



गोरेगाव आणि मालाडमधील मनोरंजन मैदानाच्या विकासासाठी हिरेन अँड कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी विविध करांसह ८ कोटी १८ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्व मुंबईतील प्रमुख रस्ते धुळमुक्त? BMC ची विशेष स्वच्छता मोहिम

मुंबई (विशेष प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या दिवाळीपूर्व धूळ व वायुप्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा भाग म्हणून

मुंबईतील आरएमसी प्लांटवरील कारवाई मोहिमेला महापौरांच्या वॉर्डापासून सुरुवात; महापालिकेच्या एन विभागातील ७ प्लांटना नोटीस, कठोर कारवाईचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणाच्या

Mumbai News: क्रॉफर्ड मार्केटच्या ऐतिहासिक वास्तूचे आणि वारसा स्थळाचे महत्त्व जपा! महापौर रितू तावडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक व जागतिक

महाराष्ट्राची लोकसंस्कृती वर्षभर जपण्यासाठी ‘बाप्पाचा कट्टा’ सुरू; मुंबई-पुण्यात उद्यापासून ९० दिवसांचा सांस्कृतिक महाउत्सव!

मुंबई:

Matheran Toy Train Resumes: 'माथेरानची राणी' पुन्हा रुळावर धावणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली नेरळ- माथेरान मिनी ट्रेन आता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे

मुंबई लोकलचा अनोखा डबा! आता सामान्य तिकीट काढून घ्या फर्स्ट क्लासचा आनंद

मुंबई लोकल म्हटली की डोळ्यांसमोर येते ती अलोट गर्दी. या रोजच्या गर्दीतून थोडा दिलासा मिळावा म्हणून अनेक प्रवासी