मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभागनिहाय अंतिम आरक्षण

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सोडत काढण्यात आली. त्यानुसार, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२५ साठीच्या एकूण २२७ जागांपैकी अनुसूचित जातीसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी २, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता ६१ जागा राखीव झाल्या. तर, एकूण २२७ जागांपैकी ११४ जागा महिलांसाठी राखीव झाल्या. यापैकी ८ जागा अनुसूचित जाती (महिला), १ जागा अनुसूचित जमाती, ३१ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तर ७४ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या २९ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या आदेशान्वये, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शुक्रवारी २८ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन