केरळमध्ये उमद्या मनाचे ९० वर्षीय वृद्ध लढवताहेत निवडणूक घरोघरी जाऊन मतांसाठी आवाहन

कोची (वृत्तसंस्था) : कोचीच्या असमानूर गावात पंचायत निवडणुकीसाठी ९० वर्षांचे एक वृद्ध व्यक्ती मोठ्या उत्साहाने आणि जोमाने उमेदवारी सादर करत आहे आणि मतांसाठी आवाहन करत आहे. नारायणन नायर हे स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. नारायणन नायर नव्वदीतही हातात काळी पिशवी घेऊन, घरोघरी जाऊन थरथरत्या आवाजात लोकांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. नारायणन नायर हे डिसेंबरमध्ये होणाऱ्या स्थानिक पंचायत निवडणुकीसाठी असमानूर ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या वॉर्डचे उमेदवार आहेत. या वयात निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या निर्णयामागील प्रेरणा काय आहे याबद्दल विचारले असता, नायर म्हणाले की वय त्यांच्यासाठी अडथळा नाही. "मला माझ्या वॉर्डसाठी खूप काम करायचे आहे. मी निवडून आलेला सदस्य झालो तरच हे शक्य होईल," असे त्यांनी माध्यमांना सांगितले. नायर यांनी अनेक लोकांकडून मते मागितली आणि त्यांना बहुतेकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ९ आणि ११ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात होणार आहेत, तर निकाल १३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत.
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा