मध्य, हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : येत्या रविवारी ३० नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेकडून उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक मुख्य, हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर बसणार आहे. मुख्य मार्गावर हा ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३. ५५ पर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या सेवा भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.


हार्बर मार्गावर हा ब्लॉक पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्ग वगळून) अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४. ०५ पर्यंत असेल. या कालावधीत पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते सुपारी ३.१२ पर्यंत बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


ट्रान्स-हार्बर मार्गावर ही हा ब्लॉक असेल या दरम्यान पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या व पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. तसेच ब्लॉककाळात पोर्ट मार्ग उपलब्ध असतील.


पश्चिम रेल्वेवर उद्या दिवसा कोणताही ब्लॉक नाही


ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टीम आणि प्राधान्य उपकरणांच्या देखभालीसाठी, पश्चिम रेल्वे शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत मुंबई मध्य आणि माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा जंबो ब्लॉक घेणार आहे.या कालावधीत जलद मार्गावरील सेवा गाड्या ब्लॉकच्या वेळेनुसार चालतील, सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान या सेवा धीम्या मार्गावर सेवा चालेल.

Comments
Add Comment

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय