जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दोन अपघात; दोन जखमी

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सकाळपासून दोन वेगवेगळे अपघात झाले. देहूरोड आणि कामशेत परिसरात दोन्ही ठिकाणी कार पलटी झाल्याची घटना घडली आहे. देहूरोड परिसरात पहाटे झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर कामशेत येथील घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहिल्या अपघातात, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या एका गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही वाहने पलटी झाली. अपघातात जखमी झालेल्या दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुसऱ्या घटनेमध्ये, कामशेतजवळील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मुंबईच्या दिशेने भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यात कार पलटी झाली. अपघातात कुणीही जखमी झाले नाही. काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
Comments
Add Comment

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.