पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावपळ, कॉल करणारा जेरबंद

पुणे : कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी मोठी खळबळ उडाली. हॉटेलच्या लँडलाईनवर आलेल्या फोनवर "हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा" अशी धमकी देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक तात्काळ हॉटेलवर दाखल झाले.


हॉटेलची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने हा कॉल ‘फेक’ असल्याचे स्पष्ट झाले. अचानक झालेल्या या गोंधळानंतर हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा कॉल एका मोबाईल क्रमांकावरून करण्यात आला होता. प्राथमिक तपासानंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे.


या प्रकरणी हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ९८३२२५२५१७ या मोबाईल क्रमांकावरून धमकी दिल्याचे नमूद केले आहे. खोडसाळ पद्धतीने केलेला हा प्रकार कोणत्या हेतूने करण्यात आला, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment

शिक्षकांना निवडणूक प्रचाराला जुंपणाऱ्या संस्थाचालकांची ‘एसआयटी’ चौकशी करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

मुंबई : शिक्षकांना निवडणूक प्रचारासाठी काम करण्यास भाग पाडणाऱ्या आणि उमेदवाराला मतदान न केल्यास नोकरीवरून

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता