'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात राज्यात ५० पेक्षा जास्त नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे. काही जण जखमी झाले आहेत. संकटाची तीव्रता वाढू लागली आहे. पण भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मुळे बिबट्यांविरोधात वन विभागाला ठोस पावले उचलता येत नाहीत. यावर उपाय म्हणून या कायद्यात सुधारणा करून सूची १ मधून बिबट्याला वगळण्यात यावे, अशी आग्रही मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केली.

खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत नियम ३७७ च्या अनुषंगाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्यांचा विषय लोकसभेत उपस्थित केला. नाशिक, बीड, नागपूर, पुणे, पालघर, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मानव-बिबट्या संघर्षाच्या गंभीर समस्येकडे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

बिबटे नागरी वस्तीत येत आहेत. नागरिकांवरील बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. पण भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मुळे बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारणे शक्य नाही. कायद्यातील तरतुदीमुळे बिबट्याला गोळी घालू शकत नाही, त्यांना इजा करू शकत नाही. जर असे केल्यास ३ वर्ष ते ७ वर्ष तुरुंगवासाची आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. गेल्या दोन महिन्यांत जुन्नर आणि शिरूर भागात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे १४ जणांचा मृत्यू झाला.

राज्यातील ऊसाच्या क्षेत्रात अंदाजे २००० बिबटे वास्तव्यास आहेत. सध्या याच बिबट्यांपैकी काही बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याची चर्चा आहे. यावर उपाय म्हणून भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या सूची १ मधून बिबट्याला वगळण्यात यावे, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केली.

 
Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि