बदलापूरमध्ये फुलले 'कमळ'

नगराध्यक्षपदी रुचिता घोरपडे, नगरसेवक संख्येत बरोबरी


बदलापूर  : कुळगाव–बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शिवसेना (शिंदे गट) यांना मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक ७ हजार ६३४ मतांच्या फरकाने जिंकत शिवसेनेचा बालेकिल्ला हादरवला. घोरपडे यांना ६४ हजार ६०४ तर शिवसेनेच्या वीणा वामन म्हात्रे यांना ५६ हजार ९७० मते मिळाली. नगराध्यक्षपद भाजपकडे गेले असले, तरी नगरसेवकांच्या संख्येत मात्र भाजप आणि शिवसेना समान पातळीवर राहिली.


पालिकेतील कथित भ्रष्टाचार, शिवसेनेतील घराणेशाहीचे आरोप (एकाच कुटुंबातील सहा उमेदवार), तसेच भाजपचा आक्रमक व नियोजनबद्ध प्रचार यामुळे भाजपचा विजय सोप्पा झाल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली जंगी सभा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेले बळही निर्णायक ठरले. ही निवडणूक शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यातील संघर्षाचे प्रतिबिंब मानली जात होती. विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेला हा संघर्ष नगरपरिषद निवडणुकीत अधिक तीव्र झाला. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत केलेली रणनितीही भाजपच्या बाजूने गेली.


दरम्यान, प्रचारादरम्यान समाजमाध्यमांवरील आरोप-प्रत्यारोप, रावळगाव फॅक्टरीचा मुद्दा आणि घराणेशाहीची चर्चा भाजपच्या प्रचाराला पूरक ठरल्याचे मानले जाते. निवडणुकीदरम्यान उघडपणे पैसे वाटपाच्या घटना घडल्या.

Comments
Add Comment

Thane Crime : ठाणे ग्रामीण भागात शाळेतील कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा आरोप; २२ अल्पवयीन विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर अटक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यावर २२ अल्पवयीन विद्यार्थिनींनी

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Badlapur Dahi Handi 2026 Accident : सातव्या थरावरून सलामी देताना चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि...; बदलापूरमध्ये अनर्थ टळला

बदलापूर : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये एक थरारक घटना घडली. ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’दरम्यान

Thane Mayor Marathon : 'गतिशील ठाणे'! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन संपन्न

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित 32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला रविवारी मोठा प्रतिसाद मिळाला. यंदाच्या

Thane incident : ठाण्यात दुचाकी चालवताना हृदयविकाराचा झटका आल्याने वकिलाचा मृत्यू; मन हेलावणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Thane : ठाणे शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना समोर आली आहे. दुचाकीवरून घरी परतत असताना अचानक

Dahi Handi : संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव, १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक मिळणार

ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे