मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई : नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर मलकापूरजवळ भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. धुपेश्वरहून मलकापूरकडे येणारी कार रस्त्यालगत असलेल्या झाडावर जोरात आदळल्याने हा अपघात घडला.


धडक इतकी तीव्र होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात रुद्र उमेश पवार आणि विनायक जनार्दन अत्तरकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशांत राजू वडारे, गणेश दीपक इंगळे आणि तक्ष धुरंधर हे तिघे गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान गणेश दीपक इंगळे यांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तिघांवर पोहोचला.


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन हटवून पंचनामा करण्यात आला. प्राथमिक तपासात अतिवेग आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं स्पष्ट झालं आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या भीषण अपघातामुळे मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी