रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर


मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी देवाचा प्रसादच आहे तो मी भक्तीभावाने स्विकारते, अशा भावना ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांनी आज येथे व्यक्त केल्या.


सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांच्या स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावेळचा १९ वा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कर ज्येष्ठ संगीतकार ओ. पी. नय्यर यांना मरणोत्तर तर मोहम्मद रफी पुरस्‍कार सुप्रसिध्‍द गायिका उत्तरा केळकर यांना बुधवारी रंग शारदा येथे झालेल्या सोहळयात प्रदान करण्यात आला.


सांस्कृतीक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी हे पुरस्कार प्रदान केले. जीवन गौरव पुरस्कर एक लाख रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह अशा स्वरुपात असून ओ.पी नय्यर यांना अखेरच्या दिवसात सांभाळणाऱ्या राणी कोळी यांना पुरस्कार स्विकारला. तर ५१ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे मोहम्मद पुरस्कराचे स्वरुप आहे.


यावेळी ॲड प्रतिमा आशिष शेलार यांच्यासह रफी यांच्या कन्या व जावई हेही उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्या कुटुंबाने प्रसिध्द केल्या महोमद रफी यांच्यावरील कॅलेंडरचे प्रकाशन ही मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जीवनगाणी तर्फे फीर रफी हा कार्यक्रम सादर करण्यात आला. गायक श्रीकांत नारायण यांनी रफी यांची गाणी सादर केली तर आरजे गौरव यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

Comments
Add Comment

Mahatma Gandhi Biopic : गांधीजींच्या भूमिकेसाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करणारा हा अभिनेता आहे तरी कोण...? फर्स्ट लूक भलताच चर्चेत!

मुंबई : असंख्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा अशा आहेत, ज्या पडद्यावर साकारण्याचं स्वप्न अनेक कलाकार पाहतात. छत्रपती

Poonam Pandey : पूनम पांडे म्हणतेय, ‘वेश्याव्यवसाय कायदेशीर करा’! सोशल मीडियावर चर्चेला उधाण

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. आता पूनम

Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या दोन दिवसांत ६० कोटींचा टप्पा पार

मुंबई : लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘मिर्झापूर: द

Suraj Chavan : कृष्णाच्या जन्मदिनी सूरजच्या घरी ‘राधा’ जन्मली; बाबा होणं ही भावना शब्दात व्यक्त करता येत नाही...

मुंबई : बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना चव्हाण यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

Bigg Boss 20 Contestants List : ‘बिग बॉस 20’ सुरू होण्याआधीच स्पर्धकांची नावं चर्चेत; यंदा कोण कोण दिसणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ आता आपल्या २०वा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या

Hanuman Ansh Movie : पाचव्या आठवड्यातही ‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच

मुंबई : कोणताही बॉलिवूड सुपरस्टार नसतानाही ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत