मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार

काळोखे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोवर शिवसेना स्वस्थ बसणार नाही


काळोखे कुटुंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सांत्वनपर भेट


खोपोली (रायगड) :- रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल काही हल्लेखोरांनी निघृणपणे हत्या केली. या हत्येने रायगडमधील राजकारण ढवळून निघाले रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घालून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.



या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, रायगड जिल्ह्यात यापूर्वी कधीही राजकीय वैमनस्य एवढ्या टोकाला गेले नव्हते. मात्र मंगेश यांच्या बाबतीत सुडाचे राजकारण घडले. अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. माझे या संपूर्ण केसवर पूर्ण लक्ष आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येला जे कुणी जबाबदार असतील त्यांना सोडणार नाही. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर मोक्का सारखे गुन्हे दाखल करू, या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, चांगल्या सरकारी वकिलांची नेमणूक करून आरोपींना फासावर वाढवण्यासाठी प्रयत्न करू. असे सांगितले. तसेच या प्रकरणी काळोखे कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करू असेही स्पष्ट केले.



यानंतर खोपोली पोलिस स्टेशनला घेराव घालून बसलेल्या शिवसैनिक आणि स्थानिक ग्रामस्थांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधून या प्रकरणातील सात आरोपींना अटक केली असून, अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यांनाही लवकरच अटक करून कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असे सांगितले. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यात हयगय करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले. या घटनेत काळोखे कुटुंबाच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही असेही सांगितले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे आणि रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

'ते' दोन चित्रपट नाकारल्याचा नेहाला होतोय पश्चात्ताप, स्पष्टच म्हणाली...

चित्रपट क्षेत्रात अनेकदा असं होतं की एखादा कलाकार असे चित्रपट नाकारतो जे पुढे जाऊन यशस्वी होतात. मात्र त्यानंतर

Ujjwal Nikam: "त्याला पाहून दोन थोबाडीत...", ललित प्रभावळकरला पाहून सरकारी वकील उज्ज्वल निकम असं का म्हणाले?

राजकुमार रावचा ‘प्रहार द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा सिनेमा 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून या

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग ! नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील पार्किंग, साधुग्राम आणि घाट विकासाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पायाभूत सुविधा उभारण्याच्या

iPhone Duo घ्यायचा विचार करताय? दुरुस्तीचा खर्च ऐकून चक्रवाल!

ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन iPhone Duo भारतात ₹२,९९,९०० या सुरुवातीच्या किंमतीत प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, हा

Eknath Shinde : दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागवले रिपोर्टकार्ड

नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Assembly)पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील

शिक्षकांना निवडणूक प्रचाराला जुंपणाऱ्या संस्थाचालकांची ‘एसआयटी’ चौकशी करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

मुंबई : शिक्षकांना निवडणूक प्रचारासाठी काम करण्यास भाग पाडणाऱ्या आणि उमेदवाराला मतदान न केल्यास नोकरीवरून