हादरवून टाकणाऱ्या लाखे कुटुंबाच्या मृत्यूचे रहस्य उलगडले


नांदेड : महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुडखेड तालुक्यातील जवळा मोरार येथे नाताळच्या दिवशी लखे कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह आढळले होते. रमेश लाखे (५१) आणि त्यांची पत्नी राधा लाखे (४५) यांचे मृतदेह घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळले होते तर २५ वर्षीय उमेश लाखे आणि त्याचा २३ वर्षीय भाऊ बजरंग ल३खे या दोघांचे मृतदेह मुगट रेल्वे स्थानकाजवळ रुळावर छिन्नविछिन्न स्थितीत आढळले होते. दोन्ही भावांनी रेल्वेखाली जीव दिल्याचे परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट दिसत होते. पण लाखे कुटुंबातील चौघांनी टोकाचे पाऊल का उचलले हे समजत नव्हते.


अखरे पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करुन तपास सुरू केला. तपास केल्यावर मुलांनीच लाखे पतीपत्नीची अर्थात रमेश आणि राधिका लखे यांची हत्या केल्याचे आणि नंतर आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले. रमेश लखे २५ वर्षांपासून आजारी होते आणि घरातच होते. त्यांच्या उपचारांवर प्रचंड खर्च होत होता. य वाढत्या खर्चामुळे त्रासलेल्या उमेश आणि बजरंग यांनी आधी लखे पती पत्नीची अर्थात स्वतःच्या आईवडिलांची हत्या केली. नंतर आत्महत्या केली. पोलिसांनी या संदर्भात एक अहवाल न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती दिली आहे.


उमेश आणि बजरंग यांनी त्यांच्या पालकांची घरी झोपेत असताना गळा दाबून हत्या केली आणि नंतर चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. रमेश लाखेला अर्धांगवायू झाला होता त्याच्या उपाचारावरील खर्च करणे अशक्य झाले होते म्हणून आलेल्या नैराश्यातून उमेश आणि बजरंग लाखे यांनी धक्कादायक कृती केली.

याआधी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. पण पोलीस तपासातून वास्तव समोर आले आहे. वास्तव समोर येताच अनेकांना धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

'ते' दोन चित्रपट नाकारल्याचा नेहाला होतोय पश्चात्ताप, स्पष्टच म्हणाली...

चित्रपट क्षेत्रात अनेकदा असं होतं की एखादा कलाकार असे चित्रपट नाकारतो जे पुढे जाऊन यशस्वी होतात. मात्र त्यानंतर

Ujjwal Nikam: "त्याला पाहून दोन थोबाडीत...", ललित प्रभावळकरला पाहून सरकारी वकील उज्ज्वल निकम असं का म्हणाले?

राजकुमार रावचा ‘प्रहार द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा सिनेमा 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून या

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग ! नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील पार्किंग, साधुग्राम आणि घाट विकासाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पायाभूत सुविधा उभारण्याच्या

iPhone Duo घ्यायचा विचार करताय? दुरुस्तीचा खर्च ऐकून चक्रवाल!

ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन iPhone Duo भारतात ₹२,९९,९०० या सुरुवातीच्या किंमतीत प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, हा

Eknath Shinde : दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागवले रिपोर्टकार्ड

नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Assembly)पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील

शिक्षकांना निवडणूक प्रचाराला जुंपणाऱ्या संस्थाचालकांची ‘एसआयटी’ चौकशी करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

मुंबई : शिक्षकांना निवडणूक प्रचारासाठी काम करण्यास भाग पाडणाऱ्या आणि उमेदवाराला मतदान न केल्यास नोकरीवरून