खुशाल शिट्ट्या फुंका; हिशोब मात्र ठेवा!

गणेश पाटील विरार : महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीसाठी केलेला खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांना पिण्यासाठी दिलेल्या पाण्यापासून तर प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या गाड्यांपर्यंत झालेल्या सर्व खर्चाचा हिशोब उमेदवारांना सादर करावा लागणार आहे. वसई-विरारमध्ये शिट्टी हे बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाचे चिन्ह आहे. सर्वच निवडणुकीत प्रचारासाठी या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात शिट्ट्या खरेदी केल्या जातात. त्यामुळे वसई-विरारमध्ये उमेदवारांसाठी खर्चाच्या दिलेल्या दर सूचित शिट्टीचे दर सुद्धा ठरवून दिले आहेत.


परिणामी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या शिट्ट्याचा हिशोब त्यांना आता आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. महापालिकेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. तसेच निवडणूक काळात नियमितपणे आयोगाने दिलेल्या साईटवर दररोज झालेला खर्च देखील टाकावा लागणार आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना ३० दिवसाच्या आत झालेल्या जमा खर्चाचा हिशोब संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ११ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा आखून देण्यात आली आहे. दरम्यान, वसई-विरार निवडणुकीसाठी उमेदवारांकडून खर्च होणाऱ्या विविध वस्तू, साहित्य, खाद्यपदार्थ, आदींचे दरपत्रक महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी ठरवून दिले आहेत.


पाणी बॉटल, पाणी जार, चहा, कॉफी, व्हेज बिर्याणी, अंडा बिर्याणी चिकन बिर्याणी, साधी जेवण थाळी, चिकन, मटण, मच्छी थाळी, यासह प्रचार कार्यालय भाडे, जाहीर सभेसाठी मैदान भाडे, लाईट, फॅन, संगणक, हार, गुलाल, मंडप, खुर्च्या, टोपी बिल्ले, मफलर अशा शेकडो वस्तू ज्या निवडणूक काळात उमेदवार वापरतात किंवा कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी खर्च करतात अशा सर्वांचे दर ठरवून देण्यात आलेले आहेत. याच वस्तूंमध्ये शिट्टीचा सुद्धा समावेश आहे. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी सर्वच निवडणुका शिट्टी या चिन्हावर लढते. महापालिका निवडणूक लढविण्यासाठी सुद्धा त्यांनी शिट्टी हे चिन्ह आयोगाकडे नोंदणीकृत करून ठेवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून प्रचारादरम्यान शिट्टीचा वापर होणार आहे. मात्र यावेळी उमेदवारांना शिट्ट्या खरेदी केल्याचा हिशोब सादर करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

Delimitation Bill : डिलिमिटेशनला शरद पवार, एम. के. स्टॅलिन यांचाही पाठिंबा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वागत

Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण ही विधेयके देशाच्या विकासासाठी तसेच लोकशाही अधिक बळकट

Chandrashekhar Bawankule : काँग्रेसला डिलिमिटेशन विधेयकामुळे सुपडा साफ होण्याची भीती; बावनकुळेंचा घणाघात

नागपूर : काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे ते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

उबाठाच्या संख्याबळावर पुन्हा निवडून येणे कठीण, म्हणूनच राऊतांची धडपड; खासदार नरेश म्हस्केंचा टोला

मुंबई: केंद्र सरकारने महिलांच्या हितासाठी आणलेल्या डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले

'भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील नवा सुवर्णअध्याय' , मतदारसंघ पुनर्रचनेला एकनाथ शिंदेंचा पाठिंबा

मुंबई : मतदारसंघांची पुनर्रचना ही भारतीय लोकशाही अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी काळाची गरज असल्याचे मत

Jitendra Awhad : मतदारसंघ पुनर्रचनेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा, जितेंद्र आव्हाडांची माहिती

मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा

BJP Leaders meet Sharad Pawar: 'डिलिमिटेशन' विधेयकासाठी भाजपची शरद पवारांशी चर्चा

मुंबई : संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी