अर्ज भरल्यापासून उमेदवाराला दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणे बंधनकारक, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची माहिती



मुंबई (विशेष प्रतिनिधी): उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून उमेदवारांनी दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंद ठेवणे बंधनकारक असून, त्यासाठी प्रचलित दरसूची निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांच्या सभा, प्रचारफेरी आदी उपक्रमांवरील खर्चाचा हिशोब तपासणे, तसेच संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा निवडणूक खर्च संनियंत्रण पथकातील लेखाधिकारी यांनी विहित नमुन्यांमध्ये नोंदविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांनी केले.


मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्‍येक प्रभागनिहाय निवडणूक खर्च संनियंत्रण पथक गठित करण्‍यात आले आहे. या निवडणूक खर्च संनियंत्रण पथकातील लेखाधिकारी, लेखापाल यांची बैठक महानगरपालिका मुख्‍यालयात पार पडली. त्‍यावेळी बेल्‍लाळे बोलत होते. प्रमुख लेखापाल (वित्‍त) वैशाली देसाई, गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीच्‍या वित्‍तीय सल्‍लागार व प्रमुख लेखाधिकारी चारूलेखा खोत यांच्‍यासह प्रशासकीय विभागातील लेखाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.





स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे तसेच त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीनुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्च स्वतंत्र बॅंक खात्यातून करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना प्राप्त होणारा निधी, देणगी बाबतच्या तपशीलाची (स्वनिधी, पक्ष निधी, भेट, कर्ज) माहिती नमुना क्रमांक १ व उमेदवाराने केलेल्या खर्चाच्या तपशीलाची माहिती नमुना क्रमांक २ मध्ये निवडणूक निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत नमुना क्रमांक ३ मधील प्रतिज्ञापत्रासह सादर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून निवडणूक प्रचाराकरीता सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या प्रचार साहित्य तथा बाबींकरीता प्रचलित स्थानिक दरांच्या अनुषंगाने दरसूची देखील तयार करण्यात आली आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केल्यानंतर उमेदवारास विहित नमुना क्रमांक ४ नुसार पोहोच देणे बंधनकारक आहे. उमेदवार आणि संबंधित कार्यालयाने ही कागदपत्रे व पोहोच व्यवस्थित जतन करणे आवश्यक आहे, असेही सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.