उमेदवारीसाठी शिवसेनेकडून ‘लाडक्या बहिणीं’ना झुकते माप

जिल्हा सचिव, तालुकाप्रमुख निवडणूक रिंगणात


विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत युती करून शिवसेना २७ जागांवर निवडणूक लढवीत आहे. शिवसेनेला मिळालेल्या २७ जागांपैकी त्यांनी १५ ठिकाणी उमेदवार म्हणून महिलांना संधी दिली आहे. शिवसेनेचे वसई-विरार महासचिव अतुल पाटील आणि वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी हे देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत.


पालघर जिल्ह्यात नुकताच पार पडलेल्या तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युती न करता स्वतंत्र निवडणूक लढविली आहे. चार पैकी दोन ठिकाणी भाजप आणि दोन ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला आहे. वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी मात्र सुरुवातीपासूनच महायुती म्हणून लढण्याची संकेत दोन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दिले होते. भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक आणि शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांनी महायुतीबाबत सुरू केलेल्या चर्चांना वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत पूर्णविराम मिळाला. या निवडणुकीत भाजप ८८, तर शिवसेना २७ जागांवर महायुती म्हणून निवडणूक लढवीत आहे. श्रमजीवी संघटना आणि आगरी सेना सुद्धा या माहितीमध्ये समाविष्ट आहे. दरम्यान, शिवसेनेकडे असलेल्या २७ जागांपैकी १५ जागांवर शिवसेनेने उमेदवार म्हणून महिलांना संधी दिली आहे.


त्याचप्रमाणे शिवसेनेच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. जिल्हा सचिव अतुल पाटील आणि तालुकाप्रमुख सुदेश चौधरी हे स्वतः निवडणूक रिंगणात आहेत, तर उपजिल्हाप्रमुख जितेंद्र शिंदे यांच्या अर्धांगिनी स्नेहल शिंदे आणि विभाग प्रमुख अमोल म्हात्रे हे देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. तसेच स्वप्निल बांदेकर, अपर्णा पाटील, सप्तमी डांबरे, हरेश्वर पाटील, कल्याणी पाटील, चंद्रकांत वझे, वैशाली सोनवणे, अश्विनी भोईर, सीमा करवाला, शुभांगी सुर्वे, पुतल झा, संजय महतो, दिपाली नारकर, अपर्णा खांबे भाविका टेलॉर, हेमलता भगत, हेमलता सिंह, अभिषेक सिंह, उज्वला किनी, शिल्पा सिंह, उमेश माळी, यशोधन ठाकूर आणि जेनी अँड्रॉ ड्रेस हे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.

Comments
Add Comment

Palghar Gas Leakage : पालघरमध्ये हायड्रोजन गॅसची गळती! मुंबई-गुजरात महामार्गावर १२ तासांचे थरारक आपत्कालीन ऑपरेशन

१३ सिलिंडरची गळती रोखली, १६० सिलिंडर सुरक्षित स्थळी हलवले मुंबई : मुंबई-गुजरात (Mumb

Palghar Wall Collapse : वाड्यात कारखान्याची भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू; 2 महिलांसह एका पुरुषाचा समावेश

पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कारखान्यातील भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

बाईईईई हा काय प्रकार! डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड ? शाळा प्रशासनाचा अजब अट्टाहास

मुंबई : मिरा-भाईंदर (Mira-BHayandar) परिसरातील शाळांमध्ये पर्यूषण पर्वाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या आहारावर लादल्या

गणेशोत्सव २०२६ : खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रयत्नांना यश! वसई-विरार महापालिकेकडून विसर्जन जेट्टीसह विशेष सुविधांची घोषणा

पालघर : पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा (Hemant Sawra) यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक

Eknath Shinde : पालघरच्या रुग्णालयातील मारहाण प्रकरण : उपमुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानंतर शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी!

पालघर : पालघरमधील (Palghar News) एका खासगी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आणि तेथे गोंधळ घालणे

Vasai factory accident : वसईमध्ये कारखान्यात मोठी दुर्घटना : ट्रान्सफॉर्मरचा रेडिएटर अंगावर पडल्याने ५४ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू!

वसई : वसईतील कामण (नायगाव पूर्व) येथील एका कारखान्यात कामगाराच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी