उत्तर भारतीयांसाठी केलेला स्वतंत्र जाहीरनामा मागे घ्या अन्यथा जाहीर होळी !

मराठी अभ्यास केंद्राचा काँग्रेसला इशारा


मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्तरभारतीयांसाठी प्रसिद्ध केलेला स्वतंत्र जाहीरनामा तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी लोक त्याची होळी करतील, असा इशारा मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी दिला. मराठी अभ्यास केंद्राने तयार केलेला मराठीनामा शुक्रवारी मराठी पत्रकारसंघात आयोजित पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला. यावेळी आनंद भंडारे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुहास राणे तसेच संयुक्त महाराष्ट्र आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


डॉ. पवार म्हणाले की, स्वतःच्या राज्यात बकालीकरण, बेकारी, असुरक्षितता आणि जातीयतेमुळे परप्रांतीय महाराष्ट्रात स्थलांतर करतात. येथील नैसर्गिक, राजकीय, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्रोतांचा वापर करूनही मराठी भाषा शिकण्यास नकार देतात. त्यातच काँग्रेससारखे पक्ष उत्तरभारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा काढतात, ही मुजोरी सहन केली जाणार नाही. परप्रांतीयांनी आपल्या राज्यात जाऊन आपली मुजोरी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठीनाम्याच्या पाठिंब्यासाठी ऑनलाइन मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


मराठीनामा सर्व राजकीय पक्षांना देण्यात येणार असून, उत्तरभारतीय, गुजराती आणि मारवाडी समाजाचे लांगुलचालन करणारे मराठी नेते महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरत आहेत, असेही पवार यांनी सांगितले. “आज सुपात असलेले उद्या जात्यात जाणारच आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेत परप्रांतीयांचा प्रवेश झाल्यास ते मराठी लोकांचा बंदोबस्त करतील,” असा इशारा त्यांनी दिला.


मराठी शाळा बंद पडण्यासाठी परप्रांतीय जबाबदार नसून मराठी असूनही इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मुलांना शिकवणारे मराठी पालकच जबाबदार असल्याचे पवार यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

Nitesh Rane: 'जिहादी मानसिकतेला बळ देऊ नका’ युनूस शेख प्रकरणी मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया

मुंबई : ‘हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या आणि जिहादी मानसिकता बाळगणाऱ्यांना बळ देऊ नये,’ अशी

सचिन सानप शिवसेनेचा उमेदवार नाही! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत

‘शिळ्या कढीला ऊत आणू नका!’ आमदार विक्रम पाचपुतेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा...

पुणे : “सुषमाताई अंधारे यांनी मला अभ्यासू आमदार असल्याचे मान्य केले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला शिवसेना, राष्ट्रवादी निवडून आणणार - मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप

भाजपच्या 100 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; पक्षाचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पक्षाच्या