तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने निवडणूक रणनीतीकार संस्था आयपीएसीचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या कोलकात्यातील निवासस्थानासह देशभरातील १५ ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईची बातमी समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संताप व्यक्त करत थेट छापेमारी सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्या आणि आयटी ऑफिसमधील अनेक फाईल घेऊन आपल्या गाडीत ठेवल्या आहेत.


छापेमारी सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर लोकशाही चिरडल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, ‘केंद्र सरकार तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना डरावण्याचा प्रयत्न करत आहे. हा लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रकार आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि तपास यंत्रणा देशाप्रति आपली जबाबदारी विसरल्या आहेत. मला अशा प्रकारच्या कारवाईची पूर्वसूचना मिळाली होती. त्यामुळे पक्षाशी संबंधित सर्व महत्त्वाचे डेटा आणि हार्ड डिस्क आधीच सुरक्षित करण्यात आल्या आहेत. आमच्या आयटी ऑफिसवर यापूर्वीही हल्ले झाले आहेत, पण आम्ही या राजकीय षडयंत्राला घाबरणार नाही’, असे ममता यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने ही कारवाई फर्जी सरकारी नोकरी नियुक्ती पत्रांच्या घोटाळ्याशी तसेच कोळसा घोटाळा प्रकरणासंबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केली आहे. सहा राज्यांमध्ये एकाच वेळी १५ ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. एका संघटित टोळीने हा मोठा घोटाळा केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि